पूर्वीपासून राज्यकर्त्यांनी मदत न केल्याने आरक्षणाचा प्रश्न चिघळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 11:50 PM2018-08-03T23:50:47+5:302018-08-03T23:51:15+5:30
राज्यकर्त्यांनी पूर्वीपासून मदत न केल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. सर्व भागात समाजबांधव उभे राहत आहेत. आत्महत्या करतायत, आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्या नसता हजारो जातील पण सगळे उठतील अन तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा अ.भा.मराठा महासंघाचे अध्यक्ष अॅड. शशीकांत पवार यांनी येथे बोलताना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यकर्त्यांनी पूर्वीपासून मदत न केल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. सर्व भागात समाजबांधव उभे राहत आहेत. आत्महत्या करतायत, आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्या नसता हजारो जातील पण सगळे उठतील अन तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा अ.भा.मराठा महासंघाचे अध्यक्ष अॅड. शशीकांत पवार यांनी येथे बोलताना दिला.
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास शुक्रवारी मान्यवरांनी भेटी दिल्या. अॅड.पवार यांनी मुंबईहून मराठा बांधवांना कशा रितीने हद्दपार केले जात असल्याची अनेक उदाहरणे दिली. मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिला नसल्याने त्यांच्याकडून चर्चेची आमंत्रणे मिळत असली तरी चचेर्साठी जाणार नसल्याचे अॅड. पवार यांनी घोषीत केले. मराठवाड्यातील चांगली माणस पेटली तर तुमची डोकी खाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच आज शांततेत बसलात उद्या तुम्हीच स्वतंत्र विचार करा असा सल्लाही अॅड. शशीकांत पवार यांनी दिला. यावेळी छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक करण गायकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी कल्याण दळे म्हणाले की, अठरा पगड जातींना सोबत घेऊन शिवरायांच्या प्रेरणेने वाटचाल करणारा मराठा समाज हौसेसाठी नव्हे तर हक्कासाठी लढतो आहे. असे सांगितले.
काँग्रेसही मराठा समाजासोबतच - जेथलिया
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्ष सोबत असल्याचे वचन दिले. आंदोलन स्थळी माजी आ.कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.