कृषी योजना प्रभावीपणे राबवा- पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:43 AM2018-06-18T00:43:34+5:302018-06-18T00:43:34+5:30
शेतकऱ्यांच्या गरजा आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन कृषी विभागाने कृषी विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश पालकमंत्री लोणीकर यांनी रविवारी मंठा येथे आयोजित आढावा बैठकीत दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गरजा आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन कृषी विभागाने कृषी विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश पालकमंत्री लोणीकर यांनी रविवारी मंठा येथे आयोजित आढावा बैठकीत दिले तसेच १ ते ३१ जुलै या वनमहोत्सवाच्या काळात जिल्ह्यात ३६ लक्ष २२ हजार वृक्ष लागवड करून मोहीम यशस्वी करणार असल्याचे लोणीकर म्हणाले.
मंठा येथील सरस्वती मंगल कार्यालयात ही बैठक झाली बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, केशव नेटके, संदीप पाटील, जिल्हा सहकार निबंधक नारायण आघाव, वनधिकारी शिंदे, कृषी विभागाचे कुलकर्णी, जि.प. सदस्य राहुल लोणीकर, भुजंगराव गोरे, गणेशराव रोकडे, अंकुश बोराडे, गणेश खवणे, पंजाबराव बोराडे नाथराव काकडे, सुभाष राठोड, बाबूराव शहाणे, बी.डी. पवार ज्ञानेश्वर शेजूळ, संदीप गोरे, राजेश मोरे, भाऊसाहेब कदम आदींसह अन्य विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
आपण नुकताच इस्रायलचा दौरा केला, तेथील तंत्रज्ञानानाच्या मदतीतून मराठवाड्यातील पाणी टंचाईवर मात करता येणे शक्य असून, तसे करारही आम्ही तेथील कंपन्यां सोबत केल्याचे लोणीकर यांनी सांगितले. या दौºयातच इस्रायल येथील शेतीलाही भेटी देण्यात आल्या इस्रायल हा एकमेव देश असा आहे की, ज्याचे कृषि तंत्रज्ञान संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. कृषी क्षेत्रातील अत्युच्च तंत्रज्ञान येथील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. त्याला जगात तोड नाही शेतीसाठी ६० टक्के, पिण्यासाठी ३० टक्के तर उद्योगांसाठी १० टक्के असे पाणीवाटपाचे प्रमाण आहे या बैठकीत पीकविमा, बोंडअळीचे अनुदान पीककर्ज वाटप याचाही आढावा घेण्यात आला
बैठकीच्या प्रारंभी गुणवंत विद्यार्थी व शेतीनिष्ठ प्रगतीशील शेतक-यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पालकमंत्री लोणीकर यांनी ईस्राईल दौरा यशस्वीपणे पूर्ण केल्याने नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
इस्त्राईलच्या दौ-यावर गेलेल्या अधिकाºयांमध्ये जालन्यातील जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय सिंग यांचाही समावेश होता. हा दौरा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, पाणी पुरवठ्यासह कृषी संबंधित वेगवेगळ्या उद्योग समूहांसोबत चर्चा करण्यात येऊन अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर करणार आहोत. मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेली वॉटरग्रीड योजना पूर्णत्वास नेण्यासाठी इस्त्राईलच्या अभियंत्यांची मदत मिळणार असल्याचे ते म्हणाले.
मंठा : कर्ज वाटपाकडे अधिका-यांनी दुर्लक्ष करू नये
शेतक-यांना जास्तीत जास्त कर्ज देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने बाराशे कोटी रूपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यातून आज २५ हजार शेतक-यांना १२८ कोटी रूपयेच वाटप झाले आहेत. याची गती बँकांनी वाढवावी नसता कामचुकार बँकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे ते म्हणाले. केवळ ठेवी घेण्याकडे कल न ठेवता व्यापारी, राष्ट्रीयीकृत बँकांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.