गावस्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:06+5:302021-07-19T04:20:06+5:30

जालना : शेतकरी, सर्वसामान्यांच्या अडचणीत धावून जाणारी शिवसेना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांसाठी असंख्य योजना राबविल्या आहेत. या ...

Efforts should be made to solve the problems at the village level | गावस्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत

गावस्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत

Next

जालना : शेतकरी, सर्वसामान्यांच्या अडचणीत धावून जाणारी शिवसेना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांसाठी असंख्य योजना राबविल्या आहेत. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी, शिवसैनिकांनी काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी केले आहे.

अंबड तालुक्यातील शिवसंपर्क मोहिमेदरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अंबड तालुक्यातील गोंदी, शहागड, धाकलगाव, साष्टपिंपळगाव, घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपर्कप्रमुख अंबादास दानवे, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा सहसंपर्कप्रमुख हिकमत उढाण, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, तालुकाप्रमुख उद्धव मरकड, तालुकाप्रमुख पंकज सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अंबादास दानवे, सहसंपर्कप्रमुख हिकमत उढाण यांनी मनोगत व्यक्त केले. पक्षसंघटन वाढीसाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमास माजी उपजिल्हाप्रमुख श्रीकृष्ण बोबडे, माजी सभापती प्रेमसिंग राठोड, तुळशीराम कोहिरे, अनिरुद्ध शिंदे, सुदाम मापारी, शिवाजी होंडे, रमेश बोबडे, पुरुषोत्तम उढाण, अनिल सानप, संदीप कंटुले, प्रशांत उढाण, संतोष बोबडे, भीमाशंकर मुळे, युनूस पठाण, गणेश खेत्रे, विजय चिमणे, सतीश काळे, गणेश पवार यांच्यासह ठिकठिकाणचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Efforts should be made to solve the problems at the village level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.