आरटीई प्रवेश अर्जासाठी आठ दिवसांची मुदतवाढ; आतापर्यंत ५,९८२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

By विजय मुंडे  | Published: March 18, 2023 06:59 PM2023-03-18T18:59:49+5:302023-03-18T19:00:02+5:30

पालकांची मागणी पाहता शासनस्तरावरून आरटीईअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Eight days extension for RTE admission application; Applications of 5,982 students have been submitted so far | आरटीई प्रवेश अर्जासाठी आठ दिवसांची मुदतवाढ; आतापर्यंत ५,९८२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

आरटीई प्रवेश अर्जासाठी आठ दिवसांची मुदतवाढ; आतापर्यंत ५,९८२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

googlenewsNext

जालना : आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी शासनाच्या वतीने आठ दिवसांची २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील २८४ शाळांमध्ये २,२७३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून, आजवर ५,९८२ मुलांचे ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२३ - २४मधील शैक्षणिक हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकानुसार २५ टक्के ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील २८२ शाळांमध्ये २,२७३ मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. शासनाच्या वतीने प्रारंभी अर्ज करण्यासाठी १७ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या अंतिम मुदतीच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ५,९८२ मुलांचे अर्ज दाखल झाले आहेत.


अंतिम मुदतीत अनेक पालकांनी मुलांचे अर्ज भरलेले नव्हते. पालकांची मागणी पाहता शासनस्तरावरून आरटीईअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांना २५ मार्चपर्यंत अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी आता वाढीव अंतिम मुदतीच्या आत मुलांचे ऑनलाइन अर्ज सादर करणे गरजेचे आहे.


आरटीई प्रवेश अर्जासाठी १७ मार्च ही अंतिम मुदत होती. शासनाने प्रवेश अर्ज करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे गरजू पालकांनी आपल्या पाल्यांचे ऑनलाइन अर्ज मुदतीत सादर करावेत. - कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी प्रा.

 

जिल्ह्यातील शाळा आणि जागा
अंबड- २६ - १५६

बदनापूर- ३६ - २३१
भोकरदन - ४३ - ३१०

घनसावंगी- १४ - १०१
जाफराबाद- २६ - १९४

जालना- ८८ - १,०४९
मंठा- २२ - ७३

परतूर २९ - १५९

Web Title: Eight days extension for RTE admission application; Applications of 5,982 students have been submitted so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.