कृषीकडून आठ भरारी पथकांची राहणार नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:31 AM2021-05-09T04:31:00+5:302021-05-09T04:31:00+5:30
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी तयारी कशी करावी याबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्रामुख्याने पालकमंत्री राजेश टोपे, आ. ...
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी तयारी कशी करावी याबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्रामुख्याने पालकमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, आ. नारायण कुचे यांची उपस्थिती होती. यावेळी आ. राजेश राठोड यांचीही प्रमुख हजेरी होती. दरम्यान, या तिन्ही आमदारांनी कृषी विभागाच्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर लक्ष वेधले. त्यात आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतकऱ्यांचे शेततळ्यांचे जवळपास एक कोटी रुपयांचे अनुदान हे एकट्या जालना तालुक्यात न मिळाल्याचे सांगून ते तातडीने देण्याचे सुचविले.
जिल्ह्यात खतांसह बियाणांचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात आला असून, बीटी बियाणांची पाकिटे ही एक जूनपासून शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन करण्यात आले बोगस बियाणे, तसेच खतांची लिंकिंग होत आहे काय, हे पाहण्यासाठी कृषीची आठ पथके राहणार असल्याचे कृषी विस्तार अधिकारी रणदिवे यांनी सांगितले.