मुख्यमंत्री फ्लॅगशिप कार्यक्रमात आठ गावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:50 AM2018-03-06T00:50:15+5:302018-03-06T00:50:37+5:30
मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आठ गावांची निवड करण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन प्राधान्याने करावयाच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आठ गावांची निवड करण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन प्राधान्याने करावयाच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले.
मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या आठ गावांच्या कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी घेण्यात आली. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत सीएसआर फंडाच्या माध्यमातून एक हजार गावांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जालना जिल्ह्यातील आठ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव, माळेगाव, मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव, अंभोरा जहांगीर, देवगाव खवणे, नायगाव प्र. सेवली व परतूर तालुक्यातील हातडी या गावांचा समावेश आहे. या गावांच्या सर्वांगिण विकासासाठी गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन गावात प्राधान्याने करावयाच्या विकास कामांबाबत गावक-यांची चर्चा करण्यात यावी. तसेच तालुकास्तरीय अधिकाºयांच्या बैठकीचे तातडीने आयोजन करुन या कामांचा आराखडा तयार करण्यात यावा. गावांमध्ये उभारण्यात आलेल्या शौचालयांचा प्रभावी वापर होण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. गावात कृषि विकासासाठी शेडनेट, शेततळे, ड्रीप, स्प्रिंकलर आदी वापरावर भर देण्याबरोबरच पाणीपुरवठा, डिजिटल शाळा, आरोग्य सुविधांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, ग्रामीण विकास यंत्रणेचे सुरेश बेदमुथा, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी आदींची उपस्थिती होती.