ए क नजर ल सी क र णा व र...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:23 AM2021-06-02T04:23:10+5:302021-06-02T04:23:10+5:30
जालना : लसीकरणाचा पहिला टप्पा जालना जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत जवळपास ३ लाख १८ जणांचे ...
जालना : लसीकरणाचा पहिला टप्पा जालना जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत जवळपास ३ लाख १८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. काही ठिकाणी खासगी केंद्रावरही लसीकरण करण्यास स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष यांना मंजुरी दिली आहे. या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ११ हजार ३७८ जणांना लस दिली असल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे. लसीकरणामध्ये सध्या तरी सातत्य आहे.
जालना जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करताना मोठी काळजी घेतली आहे.
जिल्ह्यात कोविशिल्ड या लसीची अधिक उपलब्धता झाली आहे. तुलनेने कोव्हॅक्सिन उपलबध नाही.
कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आजही अनेक जण प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले.