एकादशीचे व्रत अधुरे राहिले; जीप-ट्रकच्या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 11:19 AM2022-03-14T11:19:27+5:302022-03-14T11:19:49+5:30
एकादशीनिमित्त शेगाव येथे संत गजानन महाराज देव दर्शनासाठी जात होते.
जालना: रोहन वाडी (तालुका जिल्हा जालना) येथील भाविकांच्या जीप आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाल्याची घटना देऊळगाव राजा शहराबाहेरील वळण रस्त्यावर आज पहाटे साडेपाच वाजेदरम्यान घडली. अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील रोहनवाडी येथील बारा भाविक जीपमधून गाडी ( एम .एच. 28 v.44 21 ) एकादशीनिमित्त शेगाव येथे संत गजानन महाराज देव दर्शनासाठी जात होते. शहराबाहेरील वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक ( एम. एच. 16. Q 1682 ) आणि जीपची जोरदार धडक झाली. यात जीपमधील पाच भाविक जागीच ठार झाले. तर सात जण गंभीर जखमी झाले.
दरम्यान, मृतदेह शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असून नातेवाईकांच्या मदतीने ओळख पटविण्याचे काम चालू होते. तर गंभीर जखमींना उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन बचावकार्य सुरू केले आहे.