निवडणूक निरीक्षकांनी घेतला माध्यम तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:38 AM2019-04-05T00:38:25+5:302019-04-05T00:39:09+5:30

लोकसभेच्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास गुरूवारी निवडणूक निरीक्षक अब्दुल समद यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

Election observers took review of preparations for the media | निवडणूक निरीक्षकांनी घेतला माध्यम तयारीचा आढावा

निवडणूक निरीक्षकांनी घेतला माध्यम तयारीचा आढावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभेच्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास गुरूवारी निवडणूक निरीक्षक अब्दुल समद यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सनियंत्रण समितीच्या कामकाजाची पाहणीही त्यांनी यावेळी केली.
या भेटी दरम्यान मीडिया कक्षातील माध्यम प्रमाणीकरणासाठी विविध वाहिन्यांचा तसेच स्थानिक केबल वाहिन्यांच्या देखरेखीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी व्ही.आर. थोरात यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांना उमेदवारांकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती, इतर इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील माहितीची प्रसिद्धीपूर्व तपासणी करुन प्रसारण प्रमाणपत्र या समितीमार्फत देण्यात येते. अशी माहिती दिली. तसेच पेड न्यूजवर समितीमार्फत लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही सांगितले. निवडणूक निरीक्षक अब्दुल समद यांना यावेळी दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजीव नंदकर, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी, संगणक अभियंता तथा समितीचे सदस्य लक्ष्मीकांत देशमुख, माहिती सहायक अमोल महाजन आदींची उपस्थिती होती.
यावेळी निवडणुकीच्या प्रसार व प्रचारात माध्यमांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्या संदर्भात अब्दुल समद यांनी माहिती अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Web Title: Election observers took review of preparations for the media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.