तीन हजार कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:31 AM2019-03-24T00:31:04+5:302019-03-24T00:31:31+5:30
जालना तालुक्यातील तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांचे लोकसभा निवडणुकी संदर्भात प्रशिक्षण शुकवारी शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/रामनगर : जालना तालुक्यातील तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांचे लोकसभा निवडणुकी संदर्भात प्रशिक्षण शुकवारी शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे पार पडले.
या प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणाचा आढावा घेतला. प्रशिक्षणार्थींना मतदान यंत्राची हाताळणी कशी करावी, हे सांगितले .
आगामी लोकसभा निवडणूक चांगल्या प्रकारे पार पाडली जावी यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. २३ एप्रिलला जालना लोकसभा मतदार संघाचे मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा पहिल्यांदा समावेश केला आहे. यामुळे याची माहिती सुध्दा कर्मचाऱ्यांना देण्यात आली. आणि मतदाराच्या वेळी सर्वानी सतर्क राहून आपले कार्य चोख बजावण्याची आदेश जिल्हाधिका-यांनी यावेळी कर्मचाºयांना दिले. दोन दिवस तीन टप्प्यांत उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके तसेच तहसीलदार महेश सुधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले. मतदानाच्या एक दिवस अगोदर निवडणूक साहित्य ताब्यात घेणे. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदानापूर्वी करावयाची तयारी यानंतर प्रत्यक्ष मतदान आणि मतदान संपल्यावर करावयाची कामे तसेच कंट्रोल युनिट, बायलेट युनिट, व्ही व्हीव्हीपॅट या यंत्रांची काळजीपूर्वक हाताळणी जोडणी तसेच बंद करतेवेळी घ्यावयाची काळजी या सर्व बाबी पीपीटीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना समजावून सांगितल्या.
दरम्यान २६१ जण गैरहजर असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सुधाळकर यांनी नमूद केले.