धावडा येथे विद्युत तार तुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:23 AM2021-06-02T04:23:12+5:302021-06-02T04:23:12+5:30

समतानगर भागात ३७० विजेचे ग्राहक आहेत. या ग्राहकांना दोन रोहित्राने वीजपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. परंतु, येथे एकाच ...

Electric wire broke at Dhavada | धावडा येथे विद्युत तार तुटली

धावडा येथे विद्युत तार तुटली

googlenewsNext

समतानगर भागात ३७० विजेचे ग्राहक आहेत. या ग्राहकांना दोन रोहित्राने वीजपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. परंतु, येथे एकाच रोहित्राने वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे दर महिन्याला रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे, शिवाय गावातील वीज तार जीर्ण झाल्याने वारंवार तुडून पडत आहे. या वीज तार बदलून घेण्याची मागणी नागरिकांनी अनेकवेळा महावितरणकडे केली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तार तुटली की त्याच वीज तार यांची जोडणी केली जात आहे. काही दिवसानंतर पुन्हा तार तुटून पडते. सोमवारी धावडा परिसरात वादळी वारे वाहत होते. यावेळीच तार तुडून पडली. रस्त्यावर कुणीच नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. यामुळे ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नवीन वीज तार टाकाव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मंगळवारी वीज वितरणचे रामेश्वर धनवई, कृष्णा शेजोळ, सय्यद अझहर, पवन धनवई, सय्यद इब्राहिम आदींनी वीज तार यांची जोडणी केली.

Web Title: Electric wire broke at Dhavada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.