धावडा येथे लांडग्यांच्या हल्ल्यात अकरा शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:51 AM2018-06-24T00:51:30+5:302018-06-24T00:52:28+5:30
शेतवस्तीवरील गोठ्यात असलेल्या शेळ्यावर शुक्रवारी रात्री तीन लांडग्यांनी हल्ला करून अकरा शेळ्यांना ठार केल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
धावडा : शेतवस्तीवरील गोठ्यात असलेल्या शेळ्यावर शुक्रवारी रात्री तीन लांडग्यांनी हल्ला करून अकरा शेळ्यांना ठार केल्याची घटना घडली. परिसरात वारंवार हिंसक प्राण्यांचे हल्ले होत असताना याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
शेतकरी उषा नारायण टेंभरे यांच्या शेतवस्तीवर जनावरांच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे शेळ्या बांधल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री अचानक लांडग्यांनी अकरा शेळ्यांचा फडशा पाडला. यात सात मोठ्या आणि चार पिल्लावर हल्ला करून ठार केले.
यात गायीचे एक वासरुही जखमी झाले आहे. धावडा परिसरात मोठ्या प्रमाणात वनपरिसर आहे. परिसरात अनेक वन्य प्राण्यांचा वावर आहे. हे प्राणी शेतवस्तीवर हल्ला होण्याची परिसरातील ही तिसरी घटना आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.