दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:42 AM2021-02-27T04:42:10+5:302021-02-27T04:42:10+5:30
येथील पंचायत समिती कार्यालयातील पाणीपुरवठा विभागात चार कर्मचारी कार्यरत आहेत. या चार कर्मचाऱ्यांना डिसेंबर, जानेवारी महिन्याचे वेतन अद्यापही ...
येथील पंचायत समिती कार्यालयातील पाणीपुरवठा विभागात चार कर्मचारी कार्यरत आहेत. या चार कर्मचाऱ्यांना डिसेंबर, जानेवारी महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही. वेतन नसल्याने उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. विशेष म्हणजे, पंचायत समिती कार्यालयातील अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाइन होते. मात्र पाणीपुरवठा विभागातील या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाइन केले जाते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन वेतन देण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत पंचायत समितीच्या सदस्या पूनम अरुण डोळसे म्हणाल्या की, पाणीपुरवठा विभाग महत्त्वाचा विभाग आहे. नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करण्याचे काम या विभागातर्फे केले जाते. परंतु, याच विभागातील कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन मिळत नाही. या विभागातील कर्मचाऱ्यांना तातडीने वेतन देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.