कर्मचाऱ्यांचे एक तास काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:31 AM2018-11-29T00:31:11+5:302018-11-29T00:31:37+5:30
एका ठेकेदाराने लेखा अधिकारी उत्तम चव्हाण यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणाला. या प्रकरणी ठेकेदार मनोज गायकवाड (रा. समर्थ नगर) याच्याविरुध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एका ठेकेदाराने लेखा अधिकारी उत्तम चव्हाण यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणाला. या प्रकरणी ठेकेदार मनोज गायकवाड (रा. समर्थ नगर) याच्याविरुध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बुधवारी सकाळी लेखाधिकारी उत्तम चव्हाण हे कार्यालयात काम करत होते. तेव्हाच ठेकेदार मनोज गायकवाड हा रस्त्याच्या कामाची फाईल घेऊन कार्यालयात आला. व सहायक लेखा अधिका-यांना फाईलवर सह्या करा, असे म्हणत शिवीगाळ केली. सहायक लेखा अधिका-यांनी सह्या करण्यास नकार दिल्याने तो लेखा अधिकारी उत्तम चव्हाण यांच्याकडे जाऊन माझ्या फाईलवर सह्या करा असे म्हणत शिवीगाळ केली. परंतु, लेखा अधिकाºयांनी सही करण्यास नकार दिला. गायकवाड याने लेखा अधिकाºयास धमकावत ‘बाहेर या, तुम्हाला बघून घेईन’ असे म्हणत तेथून निघून गेला.
लेखा अधिकारी उत्तम चव्हाण यांनी घडलेला प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या कानावर टाकून कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा मनोज गायकवाड विरुध्द शासकीय कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मनोज गायकवाड हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास एपीआय मोरे करीत आहेत.
कर्मचा-यांचे पोलीस
अधीक्षकांना निवेदन
मनोज गायकवाड याला त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन कर्मचारी व अधिका-यांनी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांना दिले. यावेळी लेखा अधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती.
या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच अधिकारी व कर्मचा-यांनी काम बंद ठेवले होते. अधिकारी व कर्मचा-यांनी जि. प. समोर येऊन आंदोलन केले. यामुळे कार्यालयात शुकशुकाट पाहावयास मिळाला.