फळबाग लागवडीसाठी रोजगार हमीतून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:16 AM2018-07-16T01:16:45+5:302018-07-16T01:17:19+5:30
पारंपरिक शेती करण्यापेक्षा आता शेतकऱ्यांनी नव्याने फळबाग लागवडीकडे वळण्याची गरज आहे. यासाठी रोजगार हमी अर्थात मनरेगातून याठी आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पारंपरिक शेती करण्यापेक्षा आता शेतकऱ्यांनी नव्याने फळबाग लागवडीकडे वळण्याची गरज आहे. यासाठी रोजगार हमी अर्थात मनरेगातून याठी आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
ते शनिवारी कडवंची येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी पंचक्रोशीतील शेक-यांची उपस्थिती होती.
खोतकर यांनी शुक्रवार आणि शनिवारी असे दोन दिवस जालना मतदार संघातील विविध गावांना भेटी देऊन, कर्जमाफी, पीकविमा तसेच बोंडअळीचे अनुदान याचा आढावा घेतला. कडवंची येथे द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येथे द्राक्षाचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्या बाबत आपण विचार करत असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही वर्षात जालना जिल्हयात तुतीची लागवड वाढली असून, त्याच्या खरेदीसाठी जालन्यातच रेशीकोष खरेदीबाजाराची स्थापना केली असून, त्याचा मोठा लाभ शेतकºयांना होत आहे. पूर्वी हे रेषीम कोष विक्रीसाठी शेतक-यांना कर्नाटक राज्यातील रामनगर येथे जावे लागत होते. तेथे जाण्या-येण्याचा खर्च वाचण्यासह वेळेचीही बचत यामुळे होत असल्याचे खोतकर म्हणाले.
यावेळी त्यांनी वीज वितरण कंपनीतील अधिका-यांची बैठकही घेतली. वीजपुरवठा खंडित न करण्याच्या सूचना दिल्या.
या ग्रामीण दौ-यात त्यांच्या समवेत जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले, कडवंचीचे सरपंच चंद्रकांत पाटील आदींची उपस्थिती होती.