बसस्थानकाच्या जागेवर पोलीस बंदोबस्तात ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:53 AM2018-05-29T00:53:36+5:302018-05-29T00:53:36+5:30

येथील रेल्वेस्थानकासमोरील एसटी महामंडळाच्या जागेवर एका व्यक्तीने बेकायदेशीररीत्या केलेला ताबा सोमवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला.

Enchrochments at bus stand removed | बसस्थानकाच्या जागेवर पोलीस बंदोबस्तात ताबा

बसस्थानकाच्या जागेवर पोलीस बंदोबस्तात ताबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील रेल्वेस्थानकासमोरील एसटी महामंडळाच्या जागेवर एका व्यक्तीने बेकायदेशीररीत्या केलेला ताबा सोमवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला. या जागेवर आता महामंडळाने कब्जा केला असून, तसा नोटीस बोर्डही या ठिकाणी लावण्यात आला आहे. लोकमतने या विषयी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली.
शहरात एसटी महामंडळाची मुख्य बसस्थानकासह रेल्वेस्थानकासमोर जागा आहे. दोन्ही ठिकाणच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. एसटीचे विभागीय नियंत्रक यु.बी. वावरे यांनी सांगितले, की रेल्वेस्थानकासमोर सर्वे क्र. ७१३३ या भूखंडावर महामंडळाला राज्यनिर्मितीपासून रोड ट्रॉन्सपोर्ट विभागाकडून एक एकर जागा मिळाली आहे. या जागेवर बशीर खान फतरु खान या व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे सर्वे क्रमांक बदलून ही जागा हडपण्याचा प्रयत्न केला होता. जागेवर अतिक्रमण केले होते. न्यायालयाने मनाई हुुकूम उठविल्यानंतरही सदर व्यक्ती जागा सोडण्यास तयार नव्हती. जागेवर कब्जा करण्यासाठी गेलेल्या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी केली होती. त्यामुळे पोलीस प्रशासन, महसूल व भूमिअभिलेख कार्यालयास रीतसर पत्र देऊन या जागेची मोजणी सोमवारी दुपारी करण्यात आली.
या वेळी अतिक्रमण करणा-यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना शासकीय कार्यवाहीत हस्तक्षेप न करण्यास सांगितले. भूमिअभिलेखच्या अधिका-यांनी जागेचे मोजमाप केले. त्यानंतर एसटी महामंडळाने येथील कब्जेदाराचे बोर्ड हटवून विभागाचे बोर्ड लावले.
नियोजन : पोलिसांचा फौजफाटा
या ठिकाणचे अतिक्रण हटविण्यासाठी या पूर्वीही एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी गेले होते.मात्र, संबंधितांनी त्यांना धमकावत हाकलून दिले. याबाबत महामंडळाच्या अधिका-यांनी पोलिसात तक्रारही दिली होती. त्यामुळे आज पोलिसांना पत्र देऊन या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

Web Title: Enchrochments at bus stand removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.