अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:32 AM2020-02-12T00:32:07+5:302020-02-12T00:32:32+5:30
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव गावातील रस्त्यावर काही ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे. मंगळवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थित रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव गावातील रस्त्यावर काही ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे. मंगळवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थित रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले.
गावातील पाणंद रस्त्यावर अतिक्रमण करणाºया गट क्रमांक ९६ ९७ ६० वय ५९ या गटातील तसेच पाणंद रस्त्यावर हे अतिक्रमण केले होते. अतिक्रमण धारकांनी तातडीने त्यांनी केलेली अतिक्रमणे स्वत:हून हटवावीत, असे निर्देश यापूर्वी भूमिअभिलेख तसेच तहसील कार्यालयाने दिले होते. परंतु तरीही अतिक्रमण न हटल्याने मंगळवारी तहसीलदारांनी स्वत: पुढाकार घेत ही अतिक्रमणे हटविल्याने मोठी खळबळ उडाली. या अतिक्रमणांमध्ये अनेकांनी पक्की तसेच कच्ची दुकाने बांधली होती. तर काहींनी घराची निर्धारित हद्द सोडून थेट रस्त्यावर अतिक्रमण केले होते.
गावातील पांडुरंग करपे, तानाजी कांबळे, डॉ. देवीदास मेहत्रे, रामेश्वर तौर, शेख रशीद शेख मोहम्मद, शेख जमील शेख खलील, अर्जुन कंटुले, बद्रू कुरेशी, शेख जमील यांचे घर व परिसरातील पत्र्याचे शेड तसेच कच्ची पक्की घरे यावेळी तोडून काढण्यात आली.
मंगळवारी दुपारी घनसावंगीचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पुढाकाराने अतिक्रमण काढण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. या अतिक्रमणांमुळे कुंभार पिंपळगावातून ये-जा करणे देखील अवघड झाले होते. ही अतिक्रमणे अनेक मातब्बरांनी केल्याचे दिसून आले. भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी देखील सूचना देण्यात आल्या.