विकास कामांच्या संचिकांचा गोंधळ संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:18 AM2018-07-16T01:18:38+5:302018-07-16T01:20:24+5:30
प्रभाग क्रमांक २३ मधील विविध विकास कामांच्या संचिका पालिकेच्या रेकॉडवर सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. जवळपास २५ लाखांची कामे त्यात प्रस्तावित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील प्रभाग क्रमांक २३ मधील विविध विकास कामांच्या संचिका पालिकेच्या रेकॉडवर सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. जवळपास २५ लाखांची कामे त्यात प्रस्तावित आहेत.
जालना नगर पालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २३ मध्ये रेल्वेस्थानक, हशमतनगर परिसरात प्रत्येकी पाच लक्ष रूपयांचे नाील बांधकाम तसेच दहा लाख रूपयांचे ट्रीमिक्स आदी कामांचे प्रस्ताव मान्य करून त्यातील तीन कामांच्या निविदाही निघाल्या होत्या. मात्तत्र, पालिका प्रशासनाकडून या बाबत तक्रार करूनही कुठलीच दखल न घेतल्याने आपण सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा मांडून लेखी तक्रार केली होती. परंतु त्याचे उत्तर देतानाही पालिका प्रशासनाने आपली दिशाभूल केल्याची तक्रार संध्या देठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदना केली आहे.
तसेच स्वातंत्र्य दिनापर्यंत आपल्या या महत्त्वाच्या कामांच्या संचिका न सापडल्यास आपण उपोषणास बसणार असेल्याचा इशाराही तक्रारीत दिला आहे. एकूणच पालिकेतील ज्या अधिकारी, कर्मचा-यांनी या महत्त्वाच्या संचिकांविषयी काही काळेबेरे केले असल्यास त्यांच्यावरही चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पालिकेतील अनेक कामांच्या फाईली या पालिकेच्या रॅकार्ड रूममध्ये आवश्यक असताना त्या जवळपास सर्वच पक्षांच्या नगरसेवकांकडेच असल्याचे वास्तव आहे. मुख्याधिका-यांनी लक्ष देण्याची गरज संध्या देठे यांनी वर्तवली आहे.