निर्बंधांची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:38 AM2021-04-30T04:38:12+5:302021-04-30T04:38:12+5:30

सकाळी ११ वाजेनंतर फिरण्यास बंदी आहे. तरीही चारचाकी आणि दुचाकी वाहनाद्वारे नागरिक रस्त्यावर येत आहेत. अशा रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना ...

Enforcement of restrictions | निर्बंधांची अंमलबजावणी

निर्बंधांची अंमलबजावणी

Next

सकाळी ११ वाजेनंतर फिरण्यास बंदी आहे. तरीही चारचाकी आणि दुचाकी वाहनाद्वारे नागरिक रस्त्यावर येत आहेत. अशा रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना सदर बाजार पोलिसांनी बुधवारी अडवून विचारणा केली. यावेळी पोलीस निरीक्षक संजय देमशुख यांच्यासह सदर बाजार पोलीस ठाण्यात अन्य कर्मचारी यावेळी हजर होते.

००००००००००

कोरोना लसीकरणाचा उडाला फज्जा

जालना : शहर व ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाचा फज्जा उडाला असून कोरोना प्रतिबंधक लसीचा मुबलक पुरवठा होत नसल्याने ही वेळ आली आहे. जालना येथील काही मोजक्या केंद्रावर बुधवारी लसीकरण करण्यात आले. उर्वरीत जवळपास ७० पेक्षा अधिक केंद्र लस नसल्यामुळे बंद ठेवण्यात आले आहेत.

लसीचा अधिक पुरवठा व्हावा म्हणून ५० हजाराची नोंदणी आरोग्य उपसंचालकाकडे केलेली आहे. पंरतु, गेल्या आठवड्यामध्ये केवळ १२५० कोवॅक्सीन कंपन्याच्या लस उपलब्ध झाली आहे. या लशीचा साठाही बुधवारी सायंकाळी संपला आहे. त्यमाुळे गुरुवारपासून होणारे लसीकरण संकटात सापडले आहे.

बुधवारी सायंकाळपर्यंत जवळपास १ लाख ९५ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले होते. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

०००००००००

प्रियंका पवारला ब्रॉन्झ मेडल जाहिर

जालना : जालना येथील मार्शल आर्ट्समध्ये अव्वल स्थानावर असलेल्या प्रियंका सुदाम पवार हिने जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पिचांक स्पर्धेत ब्रॉन्झ पदक प्राप्त केले आहे. महाराष्ट्रातून ती तृतीय स्थानावर झळकली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत असून भविष्यात आशिया खंडातील वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रियंका पात्र ठरली आहे.

प्रियंका मिसाळचे एमबीबीएसमध्ये यश

जालना : येथील रहिवासी प्रियंका मुरलीधर मिसाळ हिने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे घेण्यात आलेल्या एमबीबीएसच्या परीक्षेत तृतीय क्रमांक मिळविला आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि नातेवाईकांकडून स्वागत करण्यात येत आहेत.

कोवीड केअरमध्ये ४८ रुग्णांवर उपचार

जालना : येथील अग्रसेन फाऊंडेशन मंगल कार्यालयात जिल्हा प्रशासनाने कोवीड केअर सेंटरची स्थापन केली आहे. या सेंटरमध्ये आजघडीला सौम्य लक्षणे असलेल्या ४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे सेंटर ११० खाटाचे असून याची जबाबदारी डॉ. संजय जगताप यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांना मदतीसाठी अन्य तीन डॉक्टर देण्यात आले असून, सर्व बेड ऑक्सिजनच्या पाईपलाईनने जोडले आहे. जिल्हा रुणाल्यावर येणारा ताण यामुळे कमी हाेणार आहे.

खतांसाठी पॉस मशीन बंधनकारक

जालना : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. याच्या तयारीसाठी बळीराजाकडून शेतीची मशागत केली जात आहे. डिझेलचे दर वाढल्याने नागरणीचा खर्च प्रती एकरी १ हजार ५०० रुपेय एवढा झाला आहे. त्यातच यंदा रासायिनक आणि मिश्र खताच्या किंमती सरासरी पाच ते सात टक्याने वाढल्या आहेत. खताचा मुबलक पुरवठा होणार आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी खत घेताना बीलाची पावती आणि पॉस मशीनचा वापर करणे बंधनकारक केले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी लिकिंग होत असल्यास त्याची माहिती तातडीने कळविण्याचे आवाहनही केले आहे.

Web Title: Enforcement of restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.