अभियंता सुमित शिंदेच्या इलेक्ट्रिकल सायकलची क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:24 AM2021-05-30T04:24:12+5:302021-05-30T04:24:12+5:30
नवीन जालना भागातील नळगल्ली परिसरात राहणारा सुमित दिलीप शिंदे या युवकाने ही नवीन शक्कल लढविली आहे. यासाठी त्याला आई-वडिलांची ...
नवीन जालना भागातील नळगल्ली परिसरात राहणारा सुमित दिलीप शिंदे या युवकाने ही नवीन शक्कल लढविली आहे. यासाठी त्याला आई-वडिलांची मोठी मदत झाली. यासाठी आई जमुनाबाई यांनी त्याला प्रोत्साहन दिले. ही इलेक्ट्रॉनिक्सची किट जुन्या सायकलला कशी बसवायची, ती किट कुठून आणायची याचा सर्व आढावा सुमितने घेतला. यासाठी त्याला जालन्यातील अनेकांची मदत झाल्याचे त्याने नमूद केले.
आज पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या असून, त्या शंभरी पार झाल्या आहेत. त्यामुळे ही पायडल न मारताही केवळ तीन तासांच्या चार्जिंगनंतर ही सायकल २५ किलोमीटरपेक्षा अधिक लांब अंतर कापत असल्याचे सुमितने सांगितले. ही जुन्या सायकलला किट कशी बसवली आणि अन्य युवकांच्या सायकलला कशी बसविता येते यासाठी सुमित मार्गदर्शनही करत असल्याचे तो ‘लोकमत’शी बोलतांना म्हणाला. या सायकलमुळे पैसा तसेच श्रम वाचून पर्यावरणाला हातभार लावता येऊ शकतो, असेही तो म्हणाला.