दडपण आणलं तरी माघार नाही; जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 06:43 AM2023-09-24T06:43:03+5:302023-09-24T06:44:01+5:30

मनोज जरांगे पाटील; १४ ऑक्टोबरला राज्यव्यापी मेळावा

Even if pressure is brought, there is no retreat; Jarange Patals are preparing to protest again | दडपण आणलं तरी माघार नाही; जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची तयारी

दडपण आणलं तरी माघार नाही; जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची तयारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री (जि. जालना) : आरक्षणाविना मराठा समाजातील पाच पिढ्या बरबाद झाल्या आहेत. यापुढील पिढ्या बरबाद होऊ देणार नाही. सत्ताधारी अथवा विरोधकांनी कितीही दडपण आणले तरीही आता माघार घेणार नाही, असा इशारा अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचा दौरा करणार असून, त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मेळावा घेणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

अंतरवाली सराटी येथे शनिवारी जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची विचार मंथन बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत हाेते. त्यांच्याकडे असे कोणतेही हत्यार वा शक्ती नाही की, त्याचा वापर करून ते मला फोडू शकतील. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत त्यांचा डाव चालणार नाही. सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेत्यांची शान मराठा समाजाने वाढविली आहे. आता कोण नागपूरला जातेय, कोणी कोल्हापूरला जातेय, कोणी पुण्याला जाऊन उचकून देतेय. कोणी कितीही उचकावले तरी मराठा समाज व ओबीसी समाज वाद घालणार नाही व आम्ही समोरासमोर येणार नाही. दिलेल्या मुदतीत शासनाने आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा आमरण उपोषण पुन्हा सुरू केले जाईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला. राज्यातील समाजबांधवांनी शांततेत आंदोलन करावे, कोठेही उद्रेक करू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

 

Web Title: Even if pressure is brought, there is no retreat; Jarange Patals are preparing to protest again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.