विहिरीत मुबलक पाणी तरीही मल्हारवाडीकरांना पाणी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:27+5:302021-03-07T04:27:27+5:30
जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मल्हारवाडी येथील पाणीपुरवठा योजना सहा महिन्यांपासून ...
जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मल्हारवाडी येथील पाणीपुरवठा योजना सहा महिन्यांपासून नादुरूस्त असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.
मल्हारवाडी या गावात आदिवासी समाजातील ६० कुटुंबे वास्तव्यास आहे. या गावाला पाझर तलावातील विहिरीतून पाणीपुरवठा होतो. ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी मिळावे, यासाठी येथे २०१० साली पाणीपुरवठा योजना करण्यात आली. त्यानंतर नळ योजनेद्वारे प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन देण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी दिले जाते. परंतु, मागील सहा महिन्यांपासून ही योजना नादुरूस्त झाली आहे. सध्या विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
या विहिरीची आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. तसेच विद्युत मोटारचे तारही तुटलेले दिसले. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. याबाबत ग्रामसेवक महेंद्र साबळे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, माहिती घेऊन सांगतो.
मागील काही दिवसांपासून मल्हारवाडी येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेकवेळा पाणीपुरवठा योजनेची दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
रमेश सपकाळ, नागरिक
===Photopath===
060321\06jan_14_06032021_15.jpg~060321\06jan_17_06032021_15.jpg
===Caption===
जळगाव सपकाळ~जळगाव सपकाळ