शहरात सर्वांनाच मिळणार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:19 AM2017-12-27T00:19:03+5:302017-12-27T00:19:06+5:30

शहरात नगर परिषदेच्या वतीने सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून चंदनझिरा, नूतन वसाहत व पाणीवेस येथील केंद्रांवर अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Everyone in the city will get home | शहरात सर्वांनाच मिळणार घरे

शहरात सर्वांनाच मिळणार घरे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात नगर परिषदेच्या वतीने सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून चंदनझिरा, नूतन वसाहत व पाणीवेस येथील केंद्रांवर अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरातील झोपडपट्ट्या तसेच अन्य ठिकाणी कच्च्या घरात राहणा-या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारी स्थळपाहणी करणार आहेत. आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, मतदान कार्ड, वीज बिल, बॅँक पासबुकची प्रत, कच्चे घर असल्यास कराची अद्ययावत पावती, जागेच्या मालकी खरेदीखत ही कागदपत्रे लाभासाठी आवश्यक आहेत.
अर्ज सादर करतेवेळी मूळ कागदपत्रे तपासणीकरिता उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि, आॅनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे असून त्याचा नमुना प्रकल्प व्यवस्थापकांकडे उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
सर्वेक्षण खर्चासाठी २५० रुपयांचे शुल्क नगर परिषदेकडून आकारले जाईल. चंदनझिरा येथील नगर परिषद शाळा, नूतन वसाहतमधील नगर परिषद शाळा आणि पाणीवेसमधील नगर परिषद दवाखाना या तीन ठिकाणी अर्ज वाटप व स्वीकृती सुरू राहणार आहे. नागरिकांनी उपरोक्त ठिकाणाहून अर्ज हस्तगत करुन आवश्यक कागदपत्रांसह त्याच ठिकाणी सादर करावेत व लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपाध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी केले आहे.

Web Title: Everyone in the city will get home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.