प्रत्येकाने ज्येष्ठांचे उतराई व्हावे : अर्चना अग्रवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:31 AM2021-09-19T04:31:06+5:302021-09-19T04:31:06+5:30
जालना : : कुटुंबातील ज्येष्ठ हे घराचे निर्माते असून, उतारवयात त्यांची सेवा करून ऋण फेडणे हे प्रत्येकाचे ...
जालना : : कुटुंबातील ज्येष्ठ हे घराचे निर्माते असून, उतारवयात त्यांची सेवा करून ऋण फेडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अग्र शक्ती बहू मंडळाच्या अध्यक्षा अर्चना अग्रवाल यांनी येथे केले.
अग्र शक्ती बहू मंडळ जालनातर्फे ज्येष्ठांच्या सन्मानार्थ गोकुळ लॉन्स येथे शनिवारी ‘रिश्तो का अहसास’ हा कार्यक्रम घेण्यात आला. उद्योजक घनश्याम गोयल, सुभाषचंद्र देवीदान, पुरुषोत्तम जयपुरिया, बनारसीदास जिंदल, नरेश गुप्ता, ॲड. सतीश तवरावाला, सतीश अग्रवाल, अजय भरतीया, संजय अग्रवाल, मंडळाच्या सचिव पूनम अग्रवाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अर्चना अग्रवाल पुढे म्हणाल्या, जन्माच्या गाठी हा देव बांधत असला तरी सुखी संसाराची पन्नास वर्षे एकमेकांसोबत पूर्ण करताना सुख-दुःख, आयुष्यातील चढ-उताराचे क्षण, सोबत राहून एकमेकांना साथ देणाऱ्या ज्येष्ठांनी उद्योग, व्यापार, सामाजिक प्रतिष्ठा राखत आपल्या पाल्यावर योग्य संस्कार केले, असे सांगून ज्येष्ठांचा गौरव करण्याचे भाग्य बहू मंडळास लाभल्याचे अर्चना अग्रवाल यांनी नमूद केले.
गीतकार दर्शित गादिया यांनी आपल्या भक्ती, भावगीतांमधून बाबा रामदेव, महाराजा अग्रसेन यांचे गुणगान, माता-पित्यांचे महत्त्व, नातेसंबंधातील गोडवा कसा टिकून ठेवावा, अशा नात्यांचे विविध पैलू उलगडले.
सुखी संसाराची सुवर्ण महोत्सवी वर्षे पूर्ण करणाऱ्या ३८ दाम्पत्यांचा राजस्थानी पारंपरिक पद्धतीने फेटा, शाल, श्रीफळ व विशेष भेट देऊन गौरव करण्यात आला.
प्रारंभी महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सूत्रसंचालन विनती गर्ग ( जैन) यांनी केले, तर पूजा तवरावाला यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रीती मल्लावत, ममता गुप्ता, आयुषी बगडिया, आरती पित्ती, मनीषा गोयल, सरिता धानवाला, ज्योती गंधकवाला, रचना पित्ती यांच्यासह अग्रवाल बहू मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. _______________
फोटो कॅप्शन : अग्र शक्ती बहू मंडळ आयोजित "रिश्तो का अहसास" कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना उद्योजक घनश्याम गोयल, सुभाषचंद्र
देवीदान, पुरुषोत्तम जयपुरिया, बनारसीदास जिंदल, नरेश गुप्ता, अर्चना अग्रवाल, पूनम अग्रवाल, पूजा तवरावाला, आदी दिसत आहेत.
_________________
2 Attachments