‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:51 AM2019-06-18T00:51:19+5:302019-06-18T00:52:10+5:30
आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नुकताच देशभरात लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत सर्वच ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत मोठा फरक दिसून आल्याचा आरोप करीत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव..’चा नारा देण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत मोठा फरक दिसून आला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात यावी, अशी मागणी करून ईव्हीएम विरोधात भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमवारी घंटानाद आंदोलन केले. यावेळी ‘ईव्हीएम हटाव... देश बचाव’ असा नाराही देण्यात आला. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
ईव्हीएम मशिनद्वारे मतदानात होत असलेल्या मताची मोठी अफरा-तफर थांबवावी, तसेच ईव्हीएममुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या होणाºया प्रकाराची शहानिशा करण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्रात झालेल्या सर्व ४८ लोकसभा निवडणूक क्षेत्रामध्ये परत निवडणुका घेऊन आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक डोके, डॉ. शरदचंद्र वानखेडे, डॉ. प्रवीण कनकुटे, दीपक बोराडे, माजेदभाई, विजय लहाने, राजीव दळे, बाळासाहेब रत्नपारखे, मैनाबाई खंडागळे, मीना वाहुळे, विनोद दांडगे, अॅड. कैलास रत्नपारखे, संतोष आढाव, राहुल भालेराव, राजेंद्र खरात, विष्णू खरात, दीपक घोरपडे, ज्ञानेश्वर जाधव, सर्जेराव मगरे, सुरेश उघडे, विलास नरवडे, गौतम वाघमारे, शेख हनीफ, लक्ष्मण राठोड, सुभाष आधुडे, सिद्धार्थ कनकुटे, सूरज सोनवणे आदींची उपस्थिती होती.
बदनापूर येथेही तहसीलदारांना निवेदन
बदनापूरमध्येही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार छाया पवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ईव्हीएम ऐवजी पुन्हा जुन्याच पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली.
यावेळी संतोष शेळके, रविराज वाहुळे, प्रकाश मगरे, राहुल तुपे, हरीश बोर्डे, प्रकाश खरात, अरुण हिवराळे, दगडू पवार, शैलेंद्र मिसाळ, सुरेंद्र तुपे, गणेश बोर्डे, अक्षय रगडे, भारत रगडे, पंकज सोनवणे आदी उपस्थित होते.
भोकरदनमध्येही ‘वंचित’कडून विरोध
भोकरदन येथील भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.