उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:02 AM2018-07-17T01:02:04+5:302018-07-17T01:02:39+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील पुलाजवळ वाहनाच्या तपासणीमध्ये दमन राज्यातील विदेशी कंपनीचे ७ दारूचे बॉक्ससह १ लाख २८ हजार ५०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणाना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील पुलाजवळ वाहनाच्या तपासणीमध्ये दमन राज्यातील विदेशी कंपनीचे ७ दारूचे बॉक्ससह १ लाख २८ हजार ५०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणाना अटक केली. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिस अधीक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदशर्नाखाली निरिक्षक शहाजी शिंदे, यांना मिळालेल्या माहितीनुसार एका चार चाकी वाहनातून दमण भागातील विदेशी दारू घेऊन माहोऱ्याकडे जाणाार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील पुलाजवळ सापळा रचला असता एमएच २० एजी. १०४४ या गाडीची तपासणी केली असता, सदर गाडीमध्ये दमन राज्यातील विविध प्रकारच्या विदेशी दारूचे ७ मोठे बॉक्स आढळून आले. या पथकाने गाडीमध्ये असलेल्या कृष्णा पोटदुखे (रा. मादणी, ता़सिल्लोड), व रवि कांबळे (रा. सातारा परिसर, औरंगाबाद) यांची चौकशी केली असता त्यानी उडवाउडवीची उत्तरे दिले.
त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शहाजी शिंदे, परतूरचे दुय्यम निरीक्षक सुशिल चव्हाण, जालन्याचे निरिक्षक गणेश पुसे, कर्मचारी रूपाली पंडित, ए़आऱबिजुले, रावसाहेब पल्लेवाड, डी़जे़आडेप, एस़जी़ कांबळे, सी़डी़ पवार यांनी ही कारवाई यशस्वी केली. न्यायालयात संबंधित दोन संशयितांना न्यायालयाने १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.