नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एक्साईजचे धाडसत्र सुरूच; अवैध दारू विक्री करणाऱ्या ९ जणांवर गुन्हे

By दिपक ढोले  | Published: December 31, 2022 12:03 PM2022-12-31T12:03:41+5:302022-12-31T12:04:33+5:30

पथकाने जालना -औरंगाबाद रोडवरील नागेवाडी येथे विनापरवाना दारूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन ताब्यात घेतले.

Excise dept campaign continues in the wake of New Year; Crimes against 9 people selling illegal liquor | नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एक्साईजचे धाडसत्र सुरूच; अवैध दारू विक्री करणाऱ्या ९ जणांवर गुन्हे

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एक्साईजचे धाडसत्र सुरूच; अवैध दारू विक्री करणाऱ्या ९ जणांवर गुन्हे

Next

जालना : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष मोहीम राबवून अवैध दारूची विक्री व विना परवाना दारू पिणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी रात्री या पथकाने विविध ठिकाणी छापा टाकून ९ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख ५७ हजार ९७० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पथकाने जालना -औरंगाबाद रोडवरील नागेवाडी येथे विनापरवाना दारूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन ताब्यात घेतले. त्यातून ७ दारूच्या बाॅक्ससह ६ लाख ७० हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर शहरातील संजयनगर येथून ४२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जाफराबाद तालुक्यातील नळणी रोडवरील एका ढाब्यावर कारवाई करून १३ हजार ४४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंबड तालुक्यात ठिकठिकाणी छापा टाकून पथकाने चार जणांवर गुन्हे दाखल केले आहे. त्यांच्याकडून दारूच्या बॉक्ससह असा ५ लाख ३१ हजार ८३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जवळपास ९ जणांवर गुन्हे दाखल करून १२ लाख ५७ हजार ९७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. ए. गायकवाड, एम. एन. झेंडे, आर. एन. रोकडे, भी. सू. पडूळ, पी. बी. टकले, आ. अ. महिंद्रकर, ए. ए. औटे, वि. पां. राठोड, ए. आर. बिजुले, व्ही. डी. पवार, व्ही. डी. अंभोरे, के. एस. घुणावत, डी. जी. आडेप, आर. आर. पंडित यांनी केली आहे.

Web Title: Excise dept campaign continues in the wake of New Year; Crimes against 9 people selling illegal liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.