अनलॉकच्या निर्णयाने व्यापारी, ग्राहकांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:10+5:302021-06-04T04:23:10+5:30

दरम्यान, कोरोनाची आकडेवारी आणि मृत्यू घटल्यानेच हे शक्य झाल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे आता व्यवहार सुरू करताना खूप मोठी काळजी ...

Excitement among merchants, customers with the decision to unlock | अनलॉकच्या निर्णयाने व्यापारी, ग्राहकांमध्ये उत्साह

अनलॉकच्या निर्णयाने व्यापारी, ग्राहकांमध्ये उत्साह

Next

दरम्यान, कोरोनाची आकडेवारी आणि मृत्यू घटल्यानेच हे शक्य झाल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे आता व्यवहार सुरू करताना खूप मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे गर्दी टाळण्यासाठी काही उपाय आवश्यक असल्याचे दिसून आले.

------------

मोठा दिलासा मिळाला

आज अनलॉकबाबत राज्य सरकारने जे नियम जाहीर केले आहेत, ते नक्कीच दिलासादायक आहेत. यासाठी आम्ही व्यापारी महासंघाच्या माध्यमातून आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडे ही मागणी केली. प्रत्येकाने आपल्याला चांगली साथ दिल्यानेच हे शक्य झाले आहे.

- विनीत साहनी, अध्यक्ष, व्यापारी महासंघ जालना

--------------------------

जबाबदारी वाढली

कोरोनाने शहरी आणि ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प झाले होते. ऐन लग्नसराई तसेच अन्य सभा, समारंभांवर बंधने होती. त्यामुळे बाजारपेठेतील उत्साहच हरवला होता. आता हा नवीन निर्णय शुक्रवारपासून लागू होणार असल्याने व्यापारी आणि ग्राहक खूश आहेत. परंतु आता बाजारात मास्कशिवाय विक्री न करणे, सुरक्षित अंतराचे नियम जास्तीतजास्त कसोशीने पाळणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.

- सतीश पंच, शहराध्यक्ष, व्यापारी महासंघ, जालना

--------------------------------

सम-विषमचा पर्याय ठेवावा

राज्य सरकारने अनलॉक करून सर्व व्यवहार सुरू केले आहेत. त्यामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था गतिमान होईल. हे जरी खरे असले तरी, जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून काही दुकाने सम आणि काही दुकाने विषम तारखांना उघडल्यास गर्दी कमी होईल. त्यासाठी दुकानांची वर्गवारी पाडावी लागेल.

- पुरुषोत्तम जयपुरीया, सामाजिक कार्यकर्ते, जालना

Web Title: Excitement among merchants, customers with the decision to unlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.