कार्यकारिणीने समाजाबरोबरच देशसेवा करावी -लता लाहोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:38 AM2019-12-16T00:38:06+5:302019-12-16T00:38:13+5:30
अ. भा. स्तरावर काम करणा-या माहेश्वरी महिला संघटनचे बळ या कार्यकारिणीच्या पाठीशी असल्याचे सांगून नवनियुक्त कार्यकारिणीने चौकटीत राहून समाजाबरोबरच देश सेवा करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी लता लाहोटी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नूतन कार्यकारिणीने पदाला शोभेल असे काम करावे. संघटनचे नियम आणि आचारण लक्षात घेऊन काम केल्यास या पदाधिकाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. अ. भा. स्तरावर काम करणा-या माहेश्वरी महिला संघटनचे बळ या कार्यकारिणीच्या पाठीशी असल्याचे सांगून नवनियुक्त कार्यकारिणीने चौकटीत राहून समाजाबरोबरच देश सेवा करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी लता लाहोटी यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनच्या दोनदिवसीय बैठकीचा शनिवारी सपारोप झाला. बैठकीच्या सुरुवातीस महेश पूजन करून निवडणूक परिवेक्षका सुशील काबरा यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बैठकीस प्रारंभ करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी लता लाहोटी यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली. त्यात माजी प्रदेश सचिव अनुसया मालू यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी तर संघटनमंत्री म्हणून मंगला भंडारी (जालना), सचिव सुनीता पल्लोड (ठाणे) आणि कोषाध्यक्षा म्हणून सोलापूरच्या निर्मला बलदवा यांची नियुक्ती केली. प्रदेशाध्यक्ष मालू यांची नियुक्ती जाहीर होताच सभागृहाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माहेश्वरी महिला संघटनच्या जालना जिल्हाध्यक्षा निर्मला साबू, सचिव मिनाक्षी दाड आणि त्यांच्या सहकारी पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समित्यांच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. यावेळी निर्मला साबू, मिनाक्षी दाड, कोषाध्यक्षा सरोज करवा, राजेश्री दरक, उपाध्यक्षा नूतन दाड, शिल्पा मालपाणी, पद्मा तापडीया, कविता लखोटीया, शारदा बाहेती, कोषाध्यक्षा अनिता राठी, संगीता लाहोटी, शारदा लखोटीया यांच्यासह निर्मला करवा, सुर्यमाला मालाणी यांनी परिश्रम घेतले.
या बैठकीस जिल्हा, शहर व राज्यभरातून आलेल्या महिलांसह समाजातील प्रतिष्ठीत मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यकारिणीने जोमाने काम करावे- सुशीला काबरा
यावेळी मार्गदर्शन करताना सुशीला काबरा म्हणाल्या, नवीन कार्यकारिणीने ना उमेद होता अत्यंत जोमाने काम करुन समाज आणि देश सेवेला महत्व देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमा लोया आणि संगीता लाहोटी यांनी केले तर आभार मिनाक्षी दाड यांनी मानले.
प्रदेश माहेश्वरी महिला संघटनच्या या बैठकीस माजी मंत्री आ. राजेश टोपे आणि नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. टोपे यांनी आपल्या भाषणातून माहेश्वरी महिला संघटनच्या कार्याचे कौतुक करून हा समाज नेहमीच सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारा आहे. दानशूर वृत्ती असलेल्या या समाजामुळे अनेक दीन- दुबळ्यांना आधार मिळालेला आहे. त्यामुळे या समाजाचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे ते म्हणाले.