ई-पीक पाहणीस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:32 AM2021-09-18T04:32:40+5:302021-09-18T04:32:40+5:30

देऊळगाव राजा : शासनाने ई-पीक पाहणी कार्यक्रमासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभाग ...

Extension of e-crop inspection | ई-पीक पाहणीस मुदतवाढ

ई-पीक पाहणीस मुदतवाढ

Next

देऊळगाव राजा : शासनाने ई-पीक पाहणी कार्यक्रमासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवून ई-पीक पाहणीद्वारे ऑनलाइन माहिती भरावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. सारिका भगत यांनी केले आहे.

‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ या घोषवाक्याचा आधारे शासनाने १५ ऑगस्ट रोजी ई- पीक पाहणीचा श्री गणेश केला आहे. देऊळगावराजा तालुक्यातील काही गावांमध्ये ई- पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी महसूल प्रशासनाला ई- पीक पाहणी ॲपचा वापर कसा करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत आहे. देऊळगावराजा तालुक्यात देखील तहसीलदार डॉ. सारिका भगत यांनी शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत आपल्या शेतातील खरीप पिकाचा पीक पेरा ई- पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून नोंदणी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. भगत यांनी तालुक्यातील मेहुणा राजा, सिनगावा जहाँगीर व पांगरी माळी येथील शेतात जाऊन ई- पीक पाहणीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले आहे. ई-पीक पाहणी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

फोटत्ते

Web Title: Extension of e-crop inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.