अर्थमंत्र्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:47 AM2018-02-28T00:47:11+5:302018-02-28T00:47:15+5:30
पक्षात स्वत:ची वेगळी ओळख व अर्थमंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याचे दाखविण्यासाठी त्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर स्वत:च पोस्ट टाकण्याचा प्रकार जालन्यात उघडकीस आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पक्षात स्वत:ची वेगळी ओळख व अर्थमंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याचे दाखविण्यासाठी त्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर स्वत:च पोस्ट टाकण्याचा प्रकार जालन्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
स्वप्नील सुनील अग्रवाल (रा.कादराबाद ) असे संशयित तरुणाचे नाव असून, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरून तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी तो या अकाऊंटचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.