जालन्यात बनावट बियाणांचा कारखाना उदध्वस्त; पोलीस व कृषी विभागाची संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 07:09 PM2018-04-19T19:09:15+5:302018-04-19T19:34:08+5:30

बनावट बियाणे पॅकिंग करून त्याची एजंटमार्फत विक्री करण्याचा उद्योग पोलीस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत उदध्वस्त केला.

Fake Seed factory collapses in Jalna; Police and Agriculture Department joint action | जालन्यात बनावट बियाणांचा कारखाना उदध्वस्त; पोलीस व कृषी विभागाची संयुक्त कारवाई

जालन्यात बनावट बियाणांचा कारखाना उदध्वस्त; पोलीस व कृषी विभागाची संयुक्त कारवाई

Next
ठळक मुद्देकारवाईत पोलिसांनी ६४ लाख ४२ हजारांचे कपाशी, भाजीपाला बियाणे व पॅकिंग साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तिघांना न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जालना : बनावट बियाणे पॅकिंग करून त्याची एजंटमार्फत विक्री करण्याचा उद्योग पोलीस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत उदध्वस्त केला. कारवाईत पोलिसांनी ६४ लाख ४२ हजारांचे कपाशी, भाजीपाला बियाणे व पॅकिंग साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तिघांना न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती गुरुवारी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात गतवर्षी गुलाबी बोंडअळीमुळे कापसू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी कृषी विभाग सुरुवातीलपासून बनावट बियाणे विक्री होवू नये यासाठी आवश्यक खरबदारी घेत आहे. जालना शहरातील कचेरीरोड भागात बनावट बियाणे विक्री व पॅकिंग होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. या आधारे कृषी व पोलीस विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा कचेरीरोड भागातील संशयित कल्पेश शांतिलाल टापर याच्या राहत्या घरी छापा टाकला. या ठिकाणी आरआरबीटी कपाशी बियाण्याचे पाकिटे, खुले बियाणे, तसेच भेंडी, मिरची, टरबूज, भोपळा, वांगे, कांदा या भाजीपाला पिकांचे पॅकिंग व खुल्या गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाणे आढळून आले. येथे बियाणांवर रासायनिक प्रक्रिया व रंग देवून नामांकित कंपनीचे लेबल्स वापरून खरे वाटतील, असे बियाणे तयार केले जात होते. तीनशे ते चारशे रुपयांच्या पाकिटावर हजार रुपयांपर्यंत बनावट किंमतही टाकली जात होती. पथकाने सर्व बियाणे, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त केली. चौकशीत टापर याने बाबासाहेब प्रल्हाद वाडेकर (रा. जामवाडी), हरिदास बाजीराव निहाळ (रा.चनेगाव) यांना बनावट बियाणे विक्री केल्याचे सांगितले. पथकाने दोघांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत घरातील बनावट आरबीटी कपाशी बियाण्याचा साठा जप्त केला. कारवाईत पथकाने एकूण ६४ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तिघा संशयितांवर  कदीम जालना पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र बियाणे अधिनियम, अत्यावयाक वस्तू  व सेवा कायदा आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना गुरुवारी सायंकाळी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना  २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कारवाईत यांचा सहभाग
पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, जिल्हा गुणनियंत्रक सायप्पा गरांडे, उपनिरीक्षक हनुमंत वारे, कमलाकर अंभोरे, सुरेश गिते, भालचंद्र गिरी, तुकाराम राठोड, सॅम्युअल कांबळे, फुलसिंग घुसिंगे, हिरामण फलटणकर, सदाशिव राठोड, समाधान तेलंग्रे, मदन बहुरे, रंजित वैराळ, सोमनाथ उबाळे, किशोर जाधव, योगेश जगताप, पठाण, कृषी विभागाचे एस.व्ही. कराड, पी.स. कदम, आर. एल. तांगडे, आर.जे. बोडके यांनी ही कारवाई केली.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता 
तिघा संशयितांनी हे बियाणे कुणाकडून खरेदी केले, यात कुठल्या कंपनीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात आणखी काही एजंटमार्फत अशा बनावट बियाण्याची विक्री होते का याचाही शोध घेण्यात येत आहे. बनावट बियाणांचे नुमने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून, यात पर्यावरणास हानिकारक घटक आढळल्यास संशयितांवर पर्यावरण कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल, असे जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितले.

Web Title: Fake Seed factory collapses in Jalna; Police and Agriculture Department joint action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.