आष्टी पोलीस ठाण्याचे सानप यांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:19 AM2021-07-24T04:19:09+5:302021-07-24T04:19:09+5:30
नेटवर्कमध्ये व्यत्यय तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे मागील तीन महिन्यांपासून मोबाईलच्या नेटवर्कमध्ये सातत्याने अडचणी निर्माण होत आहे. यामुळे ...
नेटवर्कमध्ये व्यत्यय
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे मागील तीन महिन्यांपासून मोबाईलच्या नेटवर्कमध्ये सातत्याने अडचणी निर्माण होत आहे. यामुळे ग्रामस्थ वैतागून गेले आहेत. सतत रेंज गायब होत असल्याने फोन सुरु असता अचानक कट होत आहे. लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक भोसले यांचा सत्कार
नेर : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी कोविड काळात उत्कृष्ट काम करून कोविड परिस्थिती अत्यंत उत्कृष्टपणे हाताळून हजारो जीव वाचविले. याबलद्दल त्यांचा नेर येथे नुकताच सत्कार करण्यात आला आहे. यावेळी नेर ग्रामीण रुग्णालयाचे वतीने वैद्यकीय अधीक्षक विजय वकोडे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य गजानन उफाड, डॉ. देशमुख, डॉ. काकडे, डॉ. बजाज यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
रामनगर येथे कोरोना योद्धयांचा सत्कार
जालना : जालना तालुक्यातील रामनगर येथील अजितदादा पवार महाविद्यालयात स्व. बाजीराव पाटील चव्हाण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिवाय, आशा वर्कर्स, आरोग्यसेवक, डॉक्टर्सचा सत्कार करण्यात आला. यावेळी रविकांत वरपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, डाॅ. निसार देशमुख, संजय वाघचौरे, सभापती कल्याण सपाटे, विष्णूपंत गायकवाड आदींची उपस्थिती होती.
लायन्सतर्फे रविवारी नेत्र तपासणी शिबिर
जालना : लायन्स क्लबच्या वतीने रविवारी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शहरातील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये सकाळी ८ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. त्यात मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांवर औरंगाबाद येथील लायन्स आय हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन क्लबच्या अध्यक्षा मिनाक्षी दाड यांनी केले.
न्यूमोनिया संरक्षण लसीकरणास सुरूवात
जाफराबाद : प्राथमिक आरोग्य केंद्र खासगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय बोर्डे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली जाफराबाद येथील उपकेंद्रात न्यूमोनिया संरक्षण लस देण्यात सुरवात करण्यात आली. पहिली न्यूमोनियाची लस श्रीनय अमोल लोखंडे या बालकास देण्यात आली आहे. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.
डॉ. प्रभाकर शेळके यांना पुरस्कार प्रदान
जालना : येथील कवी कथाकार डाॅ. प्रभाकर शेळके यांच्या ‘व्यवस्थेचा बइल’ कथासंग्रहाला राज्यस्तरीय बारावा पुरस्कार अ. भा. साहित्य महामंडळाचे कार्यवाह डाॅ. दादा गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी दयानंद माने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालचे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, जे. के. जाधव, डाॅ. राजाभाऊ टेकाळे, डाॅ. एजाज कुरेशी, विष्णू भिंगारदेव, डाॅ. भीमराव वाघचौरे आदींची उपस्थिती होती.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी १९ रूग्ण रवाना
जालना : लॉयन्स क्लब ऑफ जालनाच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या १९ रुग्णांना औरंगाबाद येथील लॉयन्स आय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. या सर्व रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. यावेळी पुरुषोत्तम जयपुरीया यांनी रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी विजय लाड, अतुल लढ्ढा, शामसुंदर लोया आदींची उपस्थिती होती.
जुनी पेन्शनसाठी रिट पिटिशन दाखल
जालना : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी ‘आस’ शिक्षक संघटनेचे हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केले आहे. आस शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रांताध्यक्ष युवराज पोवाडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात येऊन ही माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव सुधाकर गायकवाड, सत्यजित चव्हाण, किशोर नरवाडे आदी उपस्थित होते.