शेततळ्यांचे फोटो अपलोडिंग अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:44 AM2018-03-16T00:44:03+5:302018-03-16T00:44:08+5:30

मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जिल्ह्यात शेततळ्यांचे ९४.५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कृषी व महसूल विभागाच्या गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचा-यांच्या उदासीनतेमुळे सुमारे अडीच हजार शेततळ्यांचे फोटो अपलोडिंगचे काम अपूर्ण असल्याने शेतक-यांना अद्याप शेततळ्याचे अनुदान मिळालेले नाही.

Farm ponds photo uploading is incomplete | शेततळ्यांचे फोटो अपलोडिंग अपूर्ण

शेततळ्यांचे फोटो अपलोडिंग अपूर्ण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जिल्ह्यात शेततळ्यांचे ९४.५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कृषी व महसूल विभागाच्या गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचा-यांच्या उदासीनतेमुळे सुमारे अडीच हजार शेततळ्यांचे फोटो अपलोडिंगचे काम अपूर्ण असल्याने शेतक-यांना अद्याप शेततळ्याचे अनुदान मिळालेले नाही.
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्याला चालू आर्थिक वर्षाकरिता सहा हजार शेततळे खोदण्याचे उद्दिष्ट होते. पैकी पाच हजार ८०० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. जालना तालुक्यात १२३२ पैकी १०१० तर भोकरदन तालुक्यात १२६२ पैकी १२६० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. आठही तालुके मिळवून जिल्ह्यात ५००८ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, पूर्ण कामांची टक्केवारी ८३.४७ इतकी आहे. आतापर्यंत चार हजार ८१३ शेततळ्यांच्या खोदकामासाठी लाभार्थी शेतक-यांना सुमारे २३ कोटी ७९ लाखांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर अनुदान मिळविण्यासाठी कृषी सेवक, कृषी साहाय्यकांना अ‍ॅपद्वारे शेततळ्याचे फोटो काढून शेतक-याच्या लॉगिन आयडीवर आॅनलाइन अपलोड करणे आवश्यक असते. मात्र, ग्रामीण भागात प्रत्यक्ष काम करणा-या महसूल व कृषी विभागाच्या अधिका-यांकडून शेतक-यांची अडवणूक केली जात आहे. एका शेततळ्याचे फोटो अपलोड करण्यासाठी आठवडाभराहून अधिक वेळ लावला जात आहे. त्यातच सुट्टी, रजा, इंटरनेट बंद आहे, तुमच्या कामाला वेळ लागेल,अशी वेगवेगळी कारणे सांगून वेळकाढूपणा करण्याचे प्रकार कृषी सहायक व कृषी सेवकांकडून केले जात असल्याच्या तक्रारी शेतक-यांमधून केल्या जात आहे.
जिल्ह्यात पूर्ण झालेल्या पाच हजार ८ शेततळ्यांपैकी दोन हजार ६१७ शेततळ्यांच्या फोटो अपलोडिंगचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप दोन हजार ३९१ शेतळ्यांचे फोटो अपलोडिंग अपूर्ण आहे. हे काम अपूर्ण असल्यामुळे बहुतांश शेतक-यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही.
कामे करतात दुसरेच
ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, कृषीसेवक हे अनेक दिवस गावात येत नाही. अनेकजण आपली कामे पूर्ण करण्यासाठी गावातीलच एखाद्या व्यक्तीला हाताशी धरतात. अनेक महत्त्वाची शासकीय दस्तावेज अशा व्यक्तींकडे सोपविल्या जातात. मात्र, या प्रकारामुळे शेतक-यांची अडणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. शेतक-यांना कामासाठी वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले जात आहे.

Web Title: Farm ponds photo uploading is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.