घनसावंगीत किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्याने तीन एकरावरील उस तोडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 05:45 PM2018-09-08T17:45:21+5:302018-09-08T17:46:12+5:30

तालुक्यातील पिंपरखेड बु येथील शेतकरी दतात्रय विठ्ठलराव दहिफळे यांच्या तीन एकरातील उस हुमनी अळीने पोखरला आहे.

The farmer broke it on three acres sugarcane due to the presence of solid pests | घनसावंगीत किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्याने तीन एकरावरील उस तोडला 

घनसावंगीत किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्याने तीन एकरावरील उस तोडला 

Next

घनसावंगी (जालना ) : तालुक्यातील पिंपरखेड बु येथील शेतकरी दतात्रय विठ्ठलराव दहिफळे यांच्या तीन एकरातील उस हुमनी अळीने पोखरला आहे. उसाचे संगोपन करुनही हाती काही लागण्याची शक्यता नसल्याने दहिफळे यांनी आज सकाळी मोफत उस तोडून नेण्याचे नागरिकांना आवाहन केले. 

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परिसरात सिंचनासाठी पाणी मिळत असल्याने अंबड आणि घनसावंगी तालुक्यात हजारो हेक्टरवर उसाची लागवड केली आहे. उस चांगला बहरात असतांना हुमनी अळीने उस पोखरल्याने पीक पिवळे पडण्यास यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील पिंपरखेड बु येथील शेतकरी दतात्रय विठ्ठलराव दहिफळे यांच्या तीन एकरातील उससुद्धा हुमनी अळीने पोखरला. यामुळे निराश झालेल्या दहिफळे यांनी उस तोडण्याचा निर्णय घेतला. तसेच नागरिकांना मोफत उस तोडून नेण्याचे आवाहन केले. यानंतर उस तोडण्यासाठी नागरिकांनी शेतात गर्दी करत काही वेळातच तीन एकरातील उस आडवा केला.
 

Web Title: The farmer broke it on three acres sugarcane due to the presence of solid pests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.