शेतक-यास मदत नाकारली; मुलांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 04:43 AM2018-02-20T04:43:31+5:302018-02-20T04:43:39+5:30
मदतीस अपात्र ठरविले म्हणून शासनाचा निषेध करीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील दोन मुलांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयात रॉकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
बदनापूर (जि.जालना) : मदतीस अपात्र ठरविले म्हणून शासनाचा निषेध करीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील दोन मुलांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयात रॉकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
धोपटेश्वर येथील नामदेव जनार्धन दाभाडे यांनी आर्थिक अडचणीमुळे २२ एप्रिल २०१६ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांची २० गुंठे जमीन नावावर नसल्याचे कारण दाखवून शासकीय यंत्रणेने त्यांना मदतीस अपात्र ठरवले होते.
पोलिसांना योगेश व नितीन यांना वेळीच रोखले. त्यानंतर तहसीलदार प्रवीण पांडे यांनी त्यांची भेट घेवून समजूत काढली. पांडे यांनी वरिष्ठ अधिकाºयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली. मदतीच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.