म्हशीला वाचविताना शेतकऱ्याचाही तलावात बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 06:22 PM2019-09-03T18:22:48+5:302019-09-03T18:23:53+5:30

तलावात गाळ असल्याने दोघेही बुडाले

Farmer dies in lake while saving buffalo | म्हशीला वाचविताना शेतकऱ्याचाही तलावात बुडून मृत्यू 

म्हशीला वाचविताना शेतकऱ्याचाही तलावात बुडून मृत्यू 

Next

भोकरदन : तालुक्यातील हिसोडा येथे तलावात बुडून म्हैस व तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. अमोल सुदाम गोरे (३५) असे मृताचे नाव असून तो गाळात फसलेल्या म्हशीला वाचविण्याचा प्रयत्न करत होता.

या बाबतची माहिती अशी की, अमोल गोरे हा कोठाकोळी शिवारात म्हैस चरण्यासाठी घेऊन गेला होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास म्हैस गायरानातील तलावात पाणी पिण्यासाठी गेली. मात्र, तलावातील गाळात म्हैस रुतल्याने पाण्यात बुडू लागली. हे पाहताच अमोलने मागचा पुढचा विचार न करता तलावात उडी घेतली. म्हैस बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अमोलसुद्धा गाळात अडकला. यातच दोघांचाही बुडून मृत्यू झाला. 
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. मात्र तो पर्यंत अमोल व म्हेस यांचा बुडून मृत्यू झाला होता. अमोलच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी असा परिवार आहे. 

Web Title: Farmer dies in lake while saving buffalo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.