शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उद्योगात उतरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:31 AM2021-01-20T04:31:09+5:302021-01-20T04:31:09+5:30
जालना : जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगात उतरावे, असा सल्ला राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिला. ...
जालना : जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगात उतरावे, असा सल्ला राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिला.
कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी सावरगाव हडप येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माअंतर्गत स्थापना करण्यात आलेल्या आयडियल अॅग्री टेक कंपनीला नुकतीच भेट देऊन कंपनीच्या कामकाजाची माहिती घेतली. दरम्यान कृषी प्रक्रिया उद्योग, धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्राचे उद्घाटन धीरजकुमार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आत्माचे संचालक किसनराव मुळे, विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, विजय माईनकर, अभिमन्यू मगर, तालुका कृषी अधिकारी संतोष गाडे, आत्माचे दत्तात्रय सूर्यवंशी, अर्जुन मद्दलवार यांची उपस्थिती होती. दरम्यान, धीरजकुमार यांनी शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांची विविध उत्पादने याबाबत माहिती जाणून घेतली. शिवाय सोयाबीनवर प्रक्रिया करून प्रथिनेयुक्त पदार्थ बनविण्याचा सल्लाही दिला. यावेळी जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विजेच्या संदर्भात व गट शेतीस मुदतवाढ देण्याचे निवेदन धीरजकुमार यांना दिले. यावेळी कृषिभूषण रवींद्र गोलडे, भगवानराव डोंगरे, श्रीहरी काळे, संजय सोळुंके, बाळासाहेब तनपुरे, सुभाष बोडखे, सुरेश खंडाळे, ज्ञानेश्वर तौर, अशोक जाधव, गीता खांडेभराड, संजीवनी जाधव यांची उपस्थिती होती.