शेतकऱ्यांचा बँकेसमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:47 AM2018-09-16T00:47:09+5:302018-09-16T00:47:53+5:30
सोयगाव देवी येथील संतप्त शेतक-यांनी पीक कर्जासाठी शनिवारी महाराष्ट्र बँके समोर ठिय्या आंदोलन करून बँकेला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील सोयगाव देवी येथील संतप्त शेतक-यांनी पीक कर्जासाठी शनिवारी महाराष्ट्र बँके समोर ठिय्या आंदोलन करून बँकेला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु बँकेचे शाखा व्यवस्थापक सूर्यवंशी यांनी टप्प्याटप्प्याने पीक कर्ज वाटप करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले.
भोकरदन शहरातील बॅक आॅफ महाराष्ट्र शाखेत अनेक दिवसांपासून सोयगाव देवी येथील शेतक-यांनी पीककर्जासाठी अर्ज केले होते. परंतु, पीककर्ज वाटपा संदर्भात बँकेकडून टाळाटाळ होत असल्याने शनिवार कर्ज प्रकरणे निकाली काढण्याबाबत सांगण्यात आले होते. परंतू आजही आपल्या गावाचा नंबर लागत नाही असे समजल्यानंतर सरपंच श्रीमंत राऊत यांच्यासह शेतकरी बँकेत आरडाओरड करत बँके समोरच ठिय्या आंदोलन केले.
यावेळी बँकेचे प्रवेशद्वाराला टाळे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, शाखा व्यवस्थापक व्ही. व्ही. सूर्यवंशी यांनी शेतक-यांची भेट घेऊन पीककर्जा बाबत असलेल्या अडचणीवर चर्चा करून येत्या आठ ते दहा दिवसात प्रकरणे
निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच पहिल्या टप्प्यातील जवळपास २५ प्रकरणे आंदोलनानंतर निकाली काढण्यात आली.