शेतकऱ्यांसाठीच निवडणूक रिंगणात-कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:53 AM2018-10-15T00:53:08+5:302018-10-15T00:54:11+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकºयां भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानेच आपण जालना लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जनता आणि शेतकरी मला नक्कीच विजयी करतील असा दावा आ. बच्चू कडू यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. दुष्काळ, भारनियमनाच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकºयां भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानेच आपण जालना लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जनता आणि शेतकरी मला नक्कीच विजयी करतील असा दावा आ. बच्चू कडू यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. दुष्काळ, भारनियमनाच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.
यावेळी बच्चू कडू यांना जालना लोकसभा मतदार संघातून निवडून येण्यासाठीचा कुठला अजेंडा आपल्याकडे आहे काय असे विचारले असता, ते म्हणाले की, आमचे नाते हे वेदनेशी आहे. शेतकरी आज दुष्काळाने हवालदिल झालेल्या बळीराजाला धीर देण्याासह त्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपण दानवेंशी लढत देत असल्याचे कडू म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या परीक्षा संदर्भातील पोर्टलमध्ये मोठा गोंधळ असल्याचे सांगून मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही ही बाब भयंकर असल्याचे सांगितले. या पोर्टलमधून केवळ भाजपच्याच कार्यर्त्यांना नोकरी देण्यासाठीची ही उपाय योजना असल्याचे ते म्हणाले.
आगामी निवडणुकीत काँग्रेसकडे पूर्वी एवढी ताकद राहली नसून, अन्य पक्षाचा तर विचार न केलेलाच बरा असे सांगून ते म्हणाले की, आपण सलग तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडुन आलो आहोत. त्यामुळे आतही जनता आणि शेतकरी मला विजयी करतील यात शंका नसल्याचे ते म्हणाले. नागपूर येथून अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तुम्हाला येथे पाठविण्यात आले काय असे विचारले असता, त्यांच्या सल्लयानुसार मी पराभूत होईल असा टोला त्यांनी लगावला. भाजच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित येऊन त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत असताना तुम्हांला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवे पुरस्कृत केल्यास तुम्ही त्यांचा पाठिंबा घेणार काय या प्रश्नाव त्यांनी नकार देऊन आमपण त्यांना पुरस्कृत करू असा टोला लगावला.
भारनियमनाच्या मुद्यावरून त्यांनी मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात कधीच भारनियमन होत नाही, केवळ ज्या भागात शेतकरी राहतो त्याच भागाात हे भारनियमन का केले जाते, कारण तो बिचारा अन्याय सहन करण्यासाठी तयार असतो. ही बाब चुकीची असून, उर्जामंत्री बावनकुळे यांचा पुतळा हा मंत्रालयात उलटा लटकवून त्याचा निषेध करणार असल्याचेही आ. कडू यांनी सांगितले. दुष्काळच्या मुद्यावर सरकारने जे निकष लावले आहेत. ते सपशेल चुकीचे असल्याचे सांगून या मुद्यावर ३० आक्टोबरला आम्ही अकोला येथे मोठी दुष्काळ परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस साईनाथ चिन्नादोरे व अन्य पदाधिकाºयांची उपस्थिती होती. ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^