फळगळीमुळे घनसावंगी तालुक्यातील शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:04 AM2021-09-02T05:04:24+5:302021-09-02T05:04:24+5:30

घनसावंगी : तालुक्यात सहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर मोसंबीची लागवड झाली आहे; परंतु गत काही दिवसांपासून होणाऱ्या फळगळीमुळे तालुक्यातील ...

Farmers in Ghansawangi taluka are helpless due to fruits | फळगळीमुळे घनसावंगी तालुक्यातील शेतकरी हतबल

फळगळीमुळे घनसावंगी तालुक्यातील शेतकरी हतबल

Next

घनसावंगी : तालुक्यात सहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर मोसंबीची लागवड झाली आहे; परंतु गत काही दिवसांपासून होणाऱ्या फळगळीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यात व्यापारीही दर योग्य देत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.

घनसावंगी परिसरासह तालुक्यातील तणवाडी बहीरगड, म. चिंचोली, ढाकेफळ, आवलगाव, पीरगायबवाडी, दहेगाव, बोलेगाव, गुरुपिंपरी, राणीउंचेगाव, मंगू जळगाव, देवनगर, मांदळा, बोडखा, खडका, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, रांजणी, जांबसमर्थसह परिसरातील गावच्या शिवारात मोसंबीचे उत्पादन घेतले जाते; परंतु मागील एका महिन्यापासून सुरू असलेल्या फळगळीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

सध्या सुरू असलेला अंबिया बहार भरघोस फुटीअभावी कमी प्रमाणामध्ये लागलेला आहे. अशा परिस्थितीत फळगळ सुरू असल्याने झाडांवर फळांची संख्या तुरळक शिल्लक राहिली आहे. यापूर्वी अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विमा कंपन्यांकडूनही शेतकऱ्यांना कसलीच भरपाई मिळालेली नाही. याकडे संबंधित प्रशासकीय विभागांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोट

मी दोन हेक्टरमध्ये ६०० मोसंबीची झाडे लावली आहेत. आंबिया बहारातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती; परंतु, अतिवृष्टी आणि फळगळ यांमुळे निम्मेही उत्पन्न हाती पडलेले नाही. शिवाय विमा कंपनीकडे आठ हजार रुपये भरल्यानंतर एक रुपयाही कंपनीकडून मदत मिळालेली नाही.

- गणेश तारखे, मोसंबी उत्पादक

कोट

माझ्या शेतामध्ये ५०० मोसंबीची झाडे असून मागील महिन्यापासून मोठी फळगळ सुरू असल्याने मोठा फटका बसत आहे. फळगळ रोखण्यासाठी मी विविध उपाययोजनांवर हजारो रुपये खर्च केले. मात्र इतका खर्च करूनही फळगळ सुरू असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

- कृष्णा कुलकर्णी, मोसंबी उत्पादक

फोटो

Web Title: Farmers in Ghansawangi taluka are helpless due to fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.