विम्यावरून वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:33 AM2019-01-08T00:33:44+5:302019-01-08T00:35:28+5:30

विमा कंपनी आणि जिल्हाधिका-यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतक-यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन निवेदनाव्दारे केली आहे.

Farmers meet collector for crop insurance | विम्यावरून वातावरण तापले

विम्यावरून वातावरण तापले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मोसंबीच्या विमा रकमेवरून सध्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. जिल्ह्यातील पाच हजार २१५ शेतकºयांनी जवळपास ११ कोटी ३९ लाख रूपयांचा विमा हप्ता भरला होता. पैकी एक हजार २४८ शेतक-यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. ही रक्कम या शेतक-यांना नेमकी कोणत्या कारणामुळे मिळाली नाही, त्याचा खुलासा करताना आता संबंधित विमा कंपनी आणि जिल्हाधिका-यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतक-यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन निवेदनाव्दारे केली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जालना जिल्हा हा मोसंबीचे आगर म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे हे पिक जास्तीत जास्त कष्टाने जपली जाते. त्यातच यंदा दुष्काळाने रौद्ररूप धारण केल्याने विमा भरणा-यावर शेतक-यांनी प्राधान्य दिले. जिल्ह्यातील पाच हजार शेतक-यांनी एक कोटी ७० लाख रूपयांचा विमा हप्ता भरला होता. त्यातून ११ कोटी ३९ लाख रूपये नुकसान भरपाई मिळाली आहे.
टोपे यांनी सांगितले की, टाटा ए.आय.जी. विमा कंपनीकडून हा विमा स्वीकारण्यात आला. परंतु कंपनीने विम्याची नुकसान भरपाई देताना १५ जून ते १५ जुलै आणि नंतर १६ आॅगस्ट या दरम्यान पावसाचा खंड पडला होता, तो मुद्दा दुर्ललक्षित केला असल्याचे जिल्हाधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान संबंधित विमा कंपनीने शेतक-यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी जालन्यात तक्रार निवारण केंद्र स्थापन करून दिलेल्या टोल फ्री क्रमांवर संबंधित अधिकारी कुठलाच प्रतिसाद देत नसल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले. एकूणच विमा हप्ता भरूनही शेतक-यांच्या पदरी निराशा आहे.
टोपेंनी घेतली जिल्हाधिका-यांची भेट
मोसंबीच्या विमा भरण्यावरून संपूर्ण जिल्ह्यात शेतक-यांचा रोष असल्याने सोमवारी आ. राजेश टोपे यांनी जिल्हाधिका-यांची या विषयावर एक तास चर्चा केली. यावेळी सर्व आकडेवारी जिल्हाधिका-यांना सांगितली. तसेच यात शेतकºयांचे नुकसान होऊ नये, म्हणून विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांना जालन्यात बोलावून नेमकी कोणत्या कारणामुळे नुकसान भरपाई मिळाली नाही, यावर चर्चा केली. तसेच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी देखील या संदर्भात सकारात्मक भूमिका दाखवत आपण यातील नेमके कारण शोधून काढून शेतक-यांना न्याय देण्यासाठी जातीने लक्ष घालू असे आश्वासन आ. टोपे यांना दिले.

Web Title: Farmers meet collector for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.