पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:20 AM2019-06-13T00:20:09+5:302019-06-13T00:20:43+5:30

विरेगाव : लाखो रुपयांचा पीकविमा भरुनही संबंधीत कंपनीने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. खरिप हंगाम तोडावर असतांना शेतक-यांना विम्याची रक्कम ...

Farmers' Route for the Population | पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको

पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको

Next
ठळक मुद्देविरेगाव येथे आंदोलन : वाहनांच्या रांगा, प्रशासनासंदर्भात रोष, परिसरातील गावातील शेतकऱ्यांचा सहभाग

विरेगाव : लाखो रुपयांचा पीकविमा भरुनही संबंधीत कंपनीने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. खरिप हंगाम तोडावर असतांना शेतक-यांना विम्याची रक्कम मिळत नसल्याने संतप्त शेतक-यांनी या निषेधार्थ बुधवारी जालना तालुक्यातील विरेगाव येथे रास्तारोको आंदोलन करुन विम्याची रक्कम देण्याची मागणी केली.
तालुक्यातील विरेगाव, चितळी पुतळी, घोडेगाव धाणोरा, हस्तेपिंपळगाव, कवठा, वझर, ममदाबाद, शिंगाडे पोखरी, शेवगा, सारवाडी परिसरातील हजारो शेतक-यांनी बँकेत रांगा लावून पिकविम्याच्या रक्कमेचा भरणा केला. यासाठी आठ- आठ तास शेतकरी व्यवसाय सोडून बँकेच्या रांगेमध्ये उभे राहावे लागले होते. परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतक-यांना विम्याच्या रकमेचा फायदा होतो. मात्र लाखो रुपये विम्याची रक्कम संबंधीत कंपनीकडे भरुनही बोटावर मोजण्याइतपत शेतक-यांना विमा मंजूर केला आहे. विशेष म्हणजे विरेगाव आणि रामनगर सजाच्या एकाही शेतकºयाला पीकविमा मंजूर न झाल्याने शेतकºयात रोष आहे. याबाबत सदर कंपनीच्या विरोधात शेतकºयांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळअधिका-यांना निवेदन देऊन विम्याच्या रक्कम शेतकºयांना देण्याची मागणी निवेदनाव्दारे होती. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या पैशापासून दूर ठेवण्यात येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. सदर विमा कंपनी आणि प्रशासनात योग्य समन्वय नसल्याने याचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. आठ दिवसात यावर प्रशासनाने निर्णय घेऊन शेतकºयांची विम्याची रक्कम बँकेत जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशार जिल्हा कृषीअधिक्षकांना निवेदनाव्दारे दिला. यावेळी शेतकºयांनी दिला.
यावेळी दत्ता कदम, शिवाजी लकडे, किसन मोहिते, माधव टकले, बाबुराव खरात, दिलीप भुतेकर, सुभाष बागल, गणेश कदम, प्रकाश इंगळे, गणेश कारेगावकर, ज्ञानेश्वर काकडे, रावसाहेब मोहिते, भगवान घाटूळ, सुरेश खांडेभराड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकºयांची उपस्थिती होती.
वाहतूक खोळंबली : वाहनांच्या रांगा
विरेगाव येथील मुख्यमार्गावर शेतक-यांनी तासभर आंदोलन केल्याने जालन्याकडे जाणाºया वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. यावेळी मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी रत्नदीप बिरादार, मंडळ अधिकारी, तलाठी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Farmers' Route for the Population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.