बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:31 AM2019-06-24T00:31:41+5:302019-06-24T00:31:59+5:30

रविवारी बियाणे बाजारात शेतक-यांनी बी- बियाणे खरेदी करण्यासाठी तोब गर्दी केली होती.

Farmers' seizure rush to buy seeds | बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी

बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पाऊस बरसेल आणि पेरणीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. शनिवारी सूर्याचा आद्रा नक्षत्रात प्रवेश होताच जिल्हाभरात ठिकठिकाणी विजेच्या कडकडाटासह धो-धो पाऊस बरसला. त्यामुळे रविवारी बियाणे बाजारात शेतक-यांनी बी- बियाणे खरेदी करण्यासाठी तोब गर्दी केली होती. पसंती कपाशीचे पॉकेट खरेदी करण्याला बळीराजा सर्वाधिक पसंती देत होता. दिवसभरात सरासरी साडेचार ते पाच लाख कपाशीच्या पॉकेटची विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे.
मागील वर्षी पाऊस नसल्याने शेतक-यांच्या हातून खरीप व रबीचे पीक गेले आहे. यामुळे यंदा वेळेवर पाऊस पडेलं. पीक जोमाने येईल. या आशेवर शेतकरी उन्हाळ््यातच शेतीच्या कामाल लागला होता. त्यामुळे कृषी विभागातर्फे वेळेवर शेतक-यांनी बी- बियाणे मिळावे, यासाठी परिपूर्ण तयारी करण्यात आली होती. संयुक्त आणि मिश्र तसेच रासायनिक खतांचा जवळपास ६५ हजार मेट्रीकटन साठा उपलब्ध करून देण्यात आला होता. बीटी बियाणांच्या वेगवेगळ््या पाच ते सात कंपन्यांच्या बीटी बियाणांची जवळपास आठ लाख २५ हजारांपेक्षा जास्त पाकिट बाजारात दाखल झाले होते. परंतु, संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर शनिवारी सूर्याचा आद्रा नक्षत्रात प्रेवश होताच वातावरणा बदल झाला आणि विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
या पावसामुळे शेतक-यांनी काळ््या आईची ओटी भरण्यासाठी बी- बियाणांची खरेदी केली. थोडेफार पाणी उपलब्ध असलेल्या शेतक-यांनी कपाशीची लागवड केली
आहे.

Web Title: Farmers' seizure rush to buy seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.