लाखमोलाचे पशुधन बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:55 AM2018-03-14T00:55:46+5:302018-03-14T00:56:10+5:30

कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मंगळवारी जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधन विक्री आल्याचे पहावयास मिळाले. लाखमोलाची बैलजोडी केवळ ६० ते ७० हजारांना विक्री झाल्याचे दिसून आले.

Farmers selling their animals | लाखमोलाचे पशुधन बाजारात

लाखमोलाचे पशुधन बाजारात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मंगळवारी जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधन विक्री आल्याचे पहावयास मिळाले. लाखमोलाची बैलजोडी केवळ ६० ते ७० हजारांना विक्री झाल्याचे दिसून आले. शिवाय येणाºया काळात चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने पशुपालक चिंतेत आहे.
जिल्ह्यात मुबलक पाऊस पडूनही पावसाच्या पाणी योग्य प्रकारे अडविण्यात आले नाही. परिणामी जिल्ह्यातील काही तालुका सोडल्यास इतर तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पांतील साठ्यात जमतेमच पाणीसाठा उरला आहे. यामुळे उन्हाळ्यात जनावराच्या पाण्याअभावी गैरसोय होण्याची शक्यता आहे. परिणामी उन्हाळ्यात पशुधन सांभाळणे जिकरीचे ठरत असल्याने शेतकरी उन्हाळ्याच्या तोंडावर पशुधन विक्रीस आणत आहेत. मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात जनावराच्या बाजारात जालना जिल्ह्यासह धुळे, विदर्भातून म्हशी, गायी, बैलजोडी, शेळी आदी जनावरे मोठ्या प्रमाणात विक्रीस आले होते. बोेंडअळी आणि गारपिटीने ग्रस्त झालेल्या पशुपालकांना जनावराच्या बाजारातही त्यांच्या पदरी निराशा पडली.
८० ते ९० हजार रूपयापर्यंत विक्री होत असलेली बैलजोडीला मंगळवारच्या बाजारात ६० ते ७० हजार किमतीने जोडी विकली गेली. मात्र जनावरांना ने आण करण्याचा खर्चामुळे अनेकांनी नाईलाजाने जनावरे कमी दरात विकावी लागल्याचे विदर्भातील उम्रद देशमुख गावचे शेतकरी शंकर जाधव घनसावंगी तालुक्यातील पिंपळगावचे शेतकरी चार्लस निर्मल आणि मांडवा येथील शेतकरी युसूफ शेख यांनी सांगितले.

Web Title: Farmers selling their animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.