युरिया टंचाईने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:44 AM2018-07-13T00:44:56+5:302018-07-13T00:45:21+5:30
पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतर आता पेरणीसोबतच टाकण्यासाठीच्या युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अतिरिक्त युरियाचा साठा मागविला असल्याचे सांगण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतर आता पेरणीसोबतच टाकण्यासाठीच्या युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अतिरिक्त युरियाचा साठा मागविला असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात यापूर्वी कृषी विभागाने जवळपास ३९ हजार ११० मेट्रीक टन युरियाचा साठा मागविला होता. तो विविध विक्रेत्यांना वितरितही करण्यात आला होता. मात्र, जोपर्यंत दमदार पाऊस पडत नव्हता तोपर्यंत युरियासह अन्य मिश्र खतांना मागणी नव्हती. परंतु गेल्या आठ दिवसात भोकरदन आणि जाफराबाद तालुके वगळता अन्य सहा तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठीची लगबग वाढली आहे. जिल्ह्यात पाच लाख ८८ हजार खरिपाचे क्षेत्र आहे. पैकी निम्म्या क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांनी दिली. दरम्यान, बाजारात युरिया मुबलक प्रमाणात असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे कृषी विस्तार अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी केला असला तरी प्रत्यक्ष बाजारपेठेत फेरफटका मारला असता आरसीएफच्या युरियाची टंचाई असल्याचे दिसून आले.
एकूणच जी मागणी शेतक-यांची आहे, त्याला अनुसरून आम्ही युरियाची आठ हजार मेट्रिक टन अधिकची मागणी नोंदविली आहे.
येत्या एक दोन दिवसात हा युरीया रेल्वे रॅकव्दारे जालन्यात पोहचेल असे यावेळी कृषी विस्तार अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी सांगितले. लवकरच साठा उपलब्ध होणार आहे.
बाजारपेठेत शेतक-यांची गर्दी
बाजारात सध्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी होत आहे. पाऊस पडल्याने शेतक-यांच्या चेहºयावर समाधान दिसून येत आहे.