शेतकऱ्यांची लूट होणार नाही -लोणीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:45 AM2019-05-26T00:45:11+5:302019-05-26T00:45:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : दुष्काळाने होरपळणtया शेतकरी नव्या उमेदीने पुन्हा एकदा आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळाने होरपळणtया शेतकरी नव्या उमेदीने पुन्हा एकदा आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे त्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच बाजारातील बोगस बियाणे, बनावट खतांची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यासह शेतकऱ्यांची लूट होणार नाही यासाठी वाटेल ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शनिवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत दिले.
जालना जिल्हा खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा लोणीकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी आ. नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, विजय माईनकर यांच्यासह जि.प.च्या मुख्याधिकारी निमा अरोरा, कृषी विस्तार अधिकारी झनझन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यंदा जालना जिल्ह्यात जवळपास सहा लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यासाठी बीटी बियाणांची जवळपास ११ लाख पाकिटे उपलब्ध असून, त्यांच्या विक्रीला प्रारंभ करण्यात आला आहे. सोयाबीन, मूग, मका इ. ची लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असून, तुरीलाही शेतकरी प्राधान्य देतो, असे शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या खते, बियाणांचा मुबलक साठा असल्याचेही यावेळी कृषी विभागाने सांगितले. शेतकºयांची लूट थांबवण्यासाठी ९ भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. खतांची लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सांगून, पीककर्ज तातडीने वाटप करण्यासाठी नियोजन करावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाजारपेठ शेतक-यांसाठी सज्ज
यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे बाजारपेठेत बियाणे, खत विक्रेते सज्ज झाले आहेत. यंदा कुठल्याही बियाणांची टंचाई जाणवणार नाही, असे कृषी खात्याकडून आढावा बैठकीत सांगण्यात आले. दुष्काळी वातावरण असल्याने ही बैठक नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. शेतक-यांनी बियाणे, खते खरेदी करताना पावती आवश्य घ्यावी, अशा सूचना सर्व विक्रेते तसेच शेतक-यांना दिल्या आहेत. या संदर्भात कृषी सहाय्यकांनाही गावागावात ही सूचना पोहोचविण्याचे काम दिले आहे. बीटी बियाणे, सोयाबीन आणि तूर, मूग इ. बियाणांची मुबलकता महाबीजकडून करण्यात आली आहे.