शेतकऱ्यांना हिणवणा-यांना निवडणुकीत धडा शिकवणार- बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:47 AM2018-05-07T00:47:35+5:302018-05-07T00:47:35+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी नेत्यांशी चर्चा करून जालना लोकसभेची निवडणूक लढवून शेतक-यांप्रती अपशब्द वापणा-यांना धडा शिकविणार, असे प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू म्हणाले. अंबड तालुक्यातील लालवाडी येथे शनिवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी नेत्यांशी चर्चा करून जालना लोकसभेची निवडणूक लढवून शेतक-यांप्रती अपशब्द वापणा-यांना धडा शिकविणार, असे प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू म्हणाले. अंबड तालुक्यातील लालवाडी येथे शनिवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यावर आ. कडू यांनी जाहीर टीका केली.
यावेळी शामराव शिरसाठ, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, भोकरदनचे श्रीमंत राऊत, सावळाहारी शिंदे , रामा नागवे, प्रेमसींग धनावत, शेतकरी संघटनेचे देविदास वाघ, सुधाकर बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. कडू म्हणाले, की राज्यात साडेतीन लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मात्र, सरकारला त्याचे काहीच सोयरसूतक नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष शेतक-यांप्रती चुकीचे शब्द वापरून हिनवतात. आता शेतकरी त्यांचे सालपट काढल्याशिवाय राहणार नाही. शेतक-यांना अपशब्द वापणा-यांचा बदला घेण्यासाठी जालन्यातून निवडणूक लढविणार असल्याचा उच्चार त्यांनी केला. या वेळी प्रदीप शिंदे, अच्युत मोरे, विदुर लाघडे , लखन शिंदे, रणजीत कचरे, ईश्वर शिंदे, अरुण शिंदे, संतोष उगले, संतोष जगदाळे, भरत अपार, ज्ञानेश्वर चव्हाण, दिगांबर जाधव ,आरुण गाढेकर, परमेश्वर शिंदे, प्रभाकर वाघमारे, सावता मुळे, अशोक डोळे यांच्यासह ग्रामस्थांची संख्येने उपस्थिती होती.