पाण्यासाठी गुंज येथील ग्रामस्थांचे गोदापात्रात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:23 AM2019-02-13T00:23:23+5:302019-02-13T00:23:58+5:30
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी (शिवणगाव) बंधा-यातून पाणी सोडण्याच्या मागण्यासाठी गत पाच दिवसांपासून गुंज येथील गोदापात्रात उपोषण चालू केले आहे.
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी (शिवणगाव) बंधा-यातून पाणी सोडण्याच्या मागण्यासाठी गत पाच दिवसांपासून गुंज येथील गोदापात्रात उपोषण चालू केले आहे. परंतु अद्याप कडा प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने उपोषणकर्त्यामध्ये संतापाचे वातावरण आहे. कडा प्रशासनाकडून वितरिका क्र. ३२ च्या माध्यमातून पाणी सोडण्याचे सांगण्यात आले आहे तर उपोषणकर्ते यांचे शिवनगाव येथील बंधारातूनच सोडण्याचा निर्णय असल्याने सलग पाच दिवसापासून हे उपोषण सुरू आहे.
उपोषणस्थळी सिचन विभागाचे शाखा अभियंता पी. एस. खर्से, एम. एस. शेलार, वैदयकीय अधिकारी सुरेश देवडे यांनी भेट दिली आहे. शिवणगाव बंधाºयात सध्या २६.५८ पाणीसाठा उपलब्ध असून, सीआर ७३ च्या माध्यमातून राजा टाकळी (शिवनगाव) बंधाºयात पाणीसाठा चालू आहे. तर ते पाणी शिवणगाव बंधाºयात अडवले असल्याने खालील गावांना पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे गुंज,भादली, सिरसवाडी, रिदोरी, हिवरा, गव्हाण थडी, काळेगाव येथील ग्रामस्थांनी ८ फेब्रुवारीपासून मुलाबाळांसह, जनावरे घेऊन उपोषणाला सुरुवात केली आहे. शिवणगाव बंधाºयात जास्तीचे पाणी सोडून खालील गावांना पाणी सोडावे, ही मागणी मान्य करावी, यासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.
याबाबत सिंचन विभागाकडून वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. उपोषणात सरपंच भीमाशकर धनवडे, गजानन तौर, ज्ञानेश्वर कचरे, अवधूत जाधव, गणेश हुबे, शिवाजी घुमरे, आसाराम पवार, प्रकाश काजळे, अभय गुंजकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती आहे. तर दिलेल्या निवेदनात सुमारे ७५ ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.
आठ दिवसात चौथे अदोलन
सीआर क्र. ७३ मध्ये पाणी सोडून बंधाºयात पाणी सोडण्यासाठी पाहिले आंदोलन करण्यात आले. यात यश आले असून, दुसºयाच दिवसापासून पाणी खाली सोडण्यासाठी परत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ९१ सीआरमधून कालिका वस्ती,चांगतपुरी, काळेगावथड्डी यांनी अतिवाहकाच्या माध्यमाद्वारे पाणी सोडण्यासाठी आंदोलन केले. ते उपोषणही सोडण्यात आले. आता याच धर्तीवर गुंजसह परिसरातील गावांना पाणी शिवणगाव बंधाºयात सोडण्यासाठी मागील पाच दिवसापासून गुंज येथील गोदावरी नदीपत्रात धरणे आंदोलन सुरू आहे.