प्रकृती बिघडल्याने उपोषणकर्ता रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:58 AM2021-02-18T04:58:10+5:302021-02-18T04:58:10+5:30

बदनापूर : तालुक्यातील दगडवाडी येथील पोल्ट्री फार्म दुर्गंधीमुळे स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आंदोलकाची बुधवारी अचानक प्रकृती ...

The fasting person was hospitalized due to ill health | प्रकृती बिघडल्याने उपोषणकर्ता रुग्णालयात

प्रकृती बिघडल्याने उपोषणकर्ता रुग्णालयात

Next

बदनापूर : तालुक्यातील दगडवाडी येथील पोल्ट्री फार्म दुर्गंधीमुळे स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आंदोलकाची बुधवारी अचानक प्रकृती ढासळली. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बदनापूर तालुक्यातील दगडवाडी येथे पोल्ट्री फार्म आहे. या पोल्ट्री फार्ममुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे हे पोल्ट्री फार्म स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी बदनापूर तहसील कार्यालयासमोर छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणास बसलेल्या दोघांची प्रकृती बुधवारी अचानक खालावली. त्यामुळे त्यांना रूग्णवाहिकेतून बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांना अशक्तपणा वाटू लागल्याने त्यांच्यावर उपचार करून नंतर सुटी देण्यात आल्याची माहिती डॉ. मामेडवार यांनी दिली. सदर उपोषणकर्त्यांना संबंधित पोल्ट्री फॉर्मची दुर्गंधी व अन्य मागण्यांबाबत एक महिन्याचा कालावधी दिल्याची माहिती तहसीलदार शिंदे यांनी दिली.

फोटो

Web Title: The fasting person was hospitalized due to ill health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.